तांदूळ आरोग्यदायी आहेत का?


 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

तांदळामध्ये आढळणारे व्हिटामिन्स आणि मिनरल्स शरीरातील फ्री रॅडिकल्सचा धोका कमी करतात. यासोबतच मिळणारे व्हिटामिन बी कॉम्प्लेक्स शरीरात केमिकल रिअ‍ॅक्शन करून अन्नाचे उर्जेमध्ये रुपांतर करतात. तांदळातील डाएटरी प्रोटीन्स शरीरातील टीश्यूचे कार्य सुधारण्यास मदत करतात.

पांढरा तांदूळ हा प्रोसेस्ड असल्याने त्यावरील आवरण काढलेली असतात. उलट लाल किंवा हातसडीच्या तांदळावरील केवळ सालं वेगळी केलेली असतात. त्यामुळे हातसडीच्या तांदळाचा भात चविष्ट आणि तुलनेत अधिक व्हिटामिन आणि मिनरल्सचा पुरवठा देणारा असल्याने पोषक ठरतो. लाल तांदळामध्ये फॉस्फरस, मॅग्नेशियम यांचे प्रमाण मुबलक असल्याने हाडांचे आरोग्यही सुधारते.

तांदूळ हे मानवी शरीरात उर्जा देताना हृदयाच्या आरोग्यास जोखीम घेत असलेल्या खराब कोलेस्ट्रॉलला देखील संतुलित करते. हे कार्बोहायड्रेट असलेल्या अवयवांना आवश्यक उर्जा प्रदान करते.

जपानमधील कनाझवा मेडिकल युनिव्हर्सिटीच्या तज्ञांच्या एका अभ्यासानुसार, ज्या लोकांना निद्रानाश आहे, त्यांनी आपल्या आहारात अधिक तांदूळ खावा. कारण तांदूळातील प्रथिनेची उच्च पातळी इरोटोनिन संप्रेरक वाढवते आणि त्या व्यक्तीला झोप येण्यास मदत करते.

तांदळाचा आणखी एक फायदा हृदयाच्या आरोग्याशी संबंधित असून तांदळामध्ये जास्त प्रमाणात अँटिऑक्सिडेंट्स असल्याने ते हृदयाला अधिक प्रतिरोधक बनवते आणि हृदयरोगास प्रतिकार करते.

जर आपल्याला जुलाबाचा त्रास होत असेल तर तांदूळ बारीक वाटून घेऊन ते पाण्यात उकळवा. यात मीठ टाकून ही पेज प्या. यामुळे जुलाबाचा त्रास कमी होतो.

म्हणूनच तांदूळ आपल्यासाठी आरोग्यदायी आहेत. तांदळाचे आरोग्यदायी फायदे असले तरीही त्यातून शरीराला कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट्सचा पुरवठा होतो. त्यामुळे योग्य तांदळाचा आणि प्रमाणाचा विचार करून तांदूळआहारात घेणे अधिक फायदेशीर ठरते.

(कोरा या संकेतस्थळावर संकेत यांनी ही माहिती दिली आहे.)


Post a Comment

Previous Post Next Post