सतत पोट दुखतंय? मग करा ‘हे’ सहा घरगुती उपाय

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

कोणत्याही वयात उद्भवणारी समस्या म्हणजे पोटदुखी. अगदी लहान बाळांपासून ते वयस्क व्यक्तींपर्यंत अनेकदा काही जण सततच्या पोटदुखीमुळे त्रस्त असतात. बऱ्याच वेळा या पोटदुखीचं कारण पटकन लक्षात येत नाही. सामान्यपणे लहान मुलांना जंत झाल्यामुळे त्यांच्या पोटात दुखतं, तर वयस्क व्यक्तींना अपचन, गॅस किंवा अन्य कारणामुळे पोटदुखीची समस्या जाणवते. अशा समस्येमध्ये काही घरगुती उपाय आहेत. ज्यामुळे पोटदुखी बरी होऊ शकते.

पोटदुखीवर रामबाण उपाय

१. दहा ग्रॅम गुळ आणि अर्धा चमचा हिंग एकत्र करुन त्याची गोळी करावी. ही तयार गोळी घेतल्यावर त्यावर एक ग्लास कोमट पाणी प्यावं. त्यामुळे पोटात जंत झाल्यास ते मरतात आणि पोटदुखी दूर होते.

२. पोटदुखीसोबतच जुलाब होत असल्यास कोऱ्या चहामध्ये ( दूध न घालता केलेला काळा चहा) एक चमचा लिंबाचा रस टाकावा. त्यानंतर चहा प्यायल्यास जुलाब आणि पोटदुखी थांबते.

३. एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा मिक्स करावा. त्यानंतर हे पाणी प्यावं.

४. सुंठ, जिरं आणि काळीमिरी समप्रमाणात घेऊन त्याची पूड करावी. नंतर ही तयार पूड अर्धा चमचा घेऊन गरम पाण्यासोबत प्यावी.

५. एक ग्लास पाण्यात खायचा सोडा मिक्स करुन प्यायल्यास पोटातील गॅसेस दूर होतात.

६. पोट दुखत असताना प्रचंड वेदना होत असतील तर एक चमचा आल्याच्या रसात मध मिक्स करुन त्याचं सेवन करावं.

(कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Post a Comment

Previous Post Next Post