एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
आपल्या शरीरातील सर्वात नाजूक अवयव म्हणजे डोळे. त्यामुळे डोळ्यांची योग्य काळजी घेणे आणि निगा राखणे गरजेचं आहे. अनेकदा डोळ्यात धूळ, कचरा केल्यास डोळ्यांना इजा पोहोचू शकते. तसंच बऱ्यावेळा शरीरातील उष्णता वाढली किंवा अन्य काही कारणांमुळे ‘डोळे येणं’ ही समस्या निर्माण होते. त्यामुळे डोळे आल्यानंतर काही खास काळजी घेण्याची गरज असते. म्हणूनच ही काळजी नेमकी कशी घ्यावी ते जाणून घेऊयात.
१. डोळे आल्यानंतर इतरांनी वापरलेला साबण, टिश्यू पेपर, टॉवेल उशी अशा वस्तू वापरु नये.
२. कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आपल्या मनाने कोणतेही औषध किंवा आय ड्रॉप्सचा वापर करु नये.
३. सतत डोळ्याला हात लावणे टाळावे.
४. टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप अशा वस्तूपासून शक्यतो दूर रहावे. या गोष्टींचा सतत वापर केल्यामुळे डोळ्यांना त्रास होतो.
५. घराबाहेर पडताना गॉगल किंवा चष्माचा वापर करावा.
Post a Comment