एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
साधारणपणे पावसाळा सुरु झाला की बाजारात हिरव्यागार रंगाच्या पावट्याच्या शेंगा दिसू लागतात. खरं तर पावटा अनेकांना आवडत नाही. त्यामुळे काही गृहिणीदेखील ही भाजी करण्यास टाळाटाळ करतात. परंतु, पावटा खाण्याचे अनेक फायदे आहेत. यात पोटदुखीपासून ते कानदुखीपर्यंत अनेक आजारांवर पावटा गुणकारी असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे चला तर पाहुयात पावट्याच्या शेंगा खाण्याचे फायदे.
पावटा खाण्याचे फायदे
१. आम्लपित्ताच्या त्रासामुळे पोटात जळजळ होत असेल तर पावट्याच्या शेंगाचा काढा प्यावा.
२. अनेकदा स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी त्रास होतो अशावेळी पावटा किंवा पावट्याच्या शेंगाचा काढा उपयोगी ठरतो.
३. भूक कमी लागणे, अपचन होणे यासारख्या विकारात पावटा खावा.
४. ताप कमी करण्यासाठी पावट्याचा रस प्यावा.
५. ओटीपोट व कंबरदुखीचा त्रास जाणवत असेल तर तो कमी करण्यासाठी पावटय़ाची भाजी नियमितपणे आहारात खावी.
६. जुनी जखम किंवा शरीराच्या एखाद्या भागावर वेदना जाणवत असतील तर पावट्याची भाजी खावी.
७. कान ठणकत असेल तर अशा वेळी पावट्याचा रस गाळून त्याचे २ थेंब कानात टाकावा. यामुळे ठणका लगेचच कमी होतो.
(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)
Post a Comment