खोकला घालविण्यासाठी घरी करता येणारे 'हे' आयुर्वेदिक उपाय जाणून घ्या..

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

सतत वातावरणात होत असलेल्या बदलामुळे अनेक आजार पसरले आहेत. त्यात मुख्य म्हणजे खोकल्यामुळे बहुतांश लोक त्रासलेले आहेत. खोकल्यामुळे सर्दी, ताप, डोके दुखी, घश्यात खवखव अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत रूग्ण डॉक्टरांचा सल्ला न घेता परस्पर मेडीकलमधून औषधे विकत घेतात. हे तुमच्या आरोग्यावर बेतू शकतं. तर काही अशी औषधे असतात त्यामध्ये आयुर्वेदिक गुण असतात. अननस आणि मध हे खोकल्यासाठी अत्यंत गुणकारी औषध आहे. अननस आणि मधाच्या नियमित सेवनामुळे खोकला कमी होण्याची शक्यता असते.

खोकल्याचे औषध बणवण्यासाठी लागणारी सामग्री
- चिरलेले अननस
- एक टी स्पून मध
- एक छोटा आल्याचा तुकडा
- एक टी स्पून लिंबाचे रस
- चिमूटभर तिखट-गोड
- मिठ चवीनुसार

कृती
वरील सर्व पदार्थ मिक्सरमध्ये बारीक करा. औषध जास्त घट्ट झाले असेल तर त्यात थोडे पाणी घाला. त्यानंतर एका बाटलीमध्ये बंद करून ठेवा. एका आठवड्यापर्यंत औषध नियमित घेतल्यास लवकर फरक जाणवेल.

घराच्या घरी करता येण्यासाखे आयुर्वेदिक उपाय

1) जिऱ्यामध्ये व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सिडेंट असतात. जे बॅक्टेरिया, जंतू नष्ट करतात. सर्दी-खोकल्यावर जीरं खाण्याने फायदा होतो. खोकल्यावर कच्चं जिरं किंवा जिऱ्याचं पाणी पिणं फायदेशीर ठरतं.

2) हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुण असतात. जे खोकला कमी करण्यास मदत करतात. तसेच हळद कफही कमी होण्यास फायदेशीर आहे. घसा दुखत असल्यास किंवा सूज आली असल्यास हळदीच्या पाण्याच्या गुळण्या केल्यानेही आराम पडतो.

3) कोरड्या खोकल्यावर मधाचे सेवन करणं हा रामबाण उपाय मानले जाते. मधामुळे घशातील खवखव कमी होते. तसंच घशामधील संसर्गही दूर होतो. कोरडा खोकला कमी करण्यासाठी छोट्या ग्लासमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यात दोन चमचे मध मिक्स करा. मध आणि पाणी नीट मिक्स झाल्यानंतर ते प्या. नियमित हा उपाय केल्यास कोरड्या खोकल्यापासून तुम्हाला आराम मिळेल.

4) आल्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडेंट गुण असतात. खोकल्यामुळे होणारे इतर त्रासही आल्याचा रस घेतल्याने कमी होतात. खोकल्यामुळे होणारा कफही आल्याचा रस घेतल्याने कमी होतो.

5) गरम पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये एक चमचा तूप (उपलब्ध असल्यास ज्येष्ठीमधादी तूप)मिसळून ते मिश्रण एक एक चमचा वारंवार गरम गरम प्यावे.

6) ज्येष्ठमधाचा चहा प्यायल्यानंतर कोरडा खोकला कमी होतो. हा चहा तयार करण्यासाठी कपभर पाण्यामध्ये दोन मोठे चमचे ज्येष्ठमधाची पावडर उकळत ठेवा. १० ते १५ मिनिटे पाणी उकळू द्या. यानंतर कपामध्ये चहा गाळून घ्या. तुम्हाला हवे असल्यास चहामध्ये मध मिक्स करू शकता. दिवसातून दोन वेळा हा चहा तुम्ही पिऊ शकता.

7) सर्दी आणि खोकल्यावर गूळ खाणे हा प्रभावी उपाय आहे. गुळातील पोषक घटकांमुळे जमा झालेला कफ बाहेर पडण्यास मदत मिळते. सर्दी खोकल्याव्यतिरिक्त गुळामुळे पचनाशी संबंधित समस्या देखील कमी होतात. कोमट पाण्यामध्ये गूळ पावडर मिक्स करा आणि प्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रमाण आणि दिवसातून किती वेळा हा उपाय करावा, याबाबत सल्ला घ्यावा.

(कोरा या संकेतस्थळावर संकेत यांनी ही माहिती दिली आहे. कोणतेही उपचार करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.)


Post a Comment

Previous Post Next Post