पित्ताचा त्रास टाळण्यासाठी करा ‘हे’ उपाय


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

पित्त हा घटक मानवी शरीरासाठी अतिशय महत्त्वाचा घटक आहे. पण सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात बदलती जीवनशैली, जेवणाच्या अनियमित वेळा, अपुरी झोपं, बदललेले आहाराचे स्वरूप यामुळे अपचन किंवा अँसिडिटीचा त्रास होणे अशा अनेक समस्या होताना दिसतात. अँसिडिटी म्हणजे आम्लपित्त. यात जठरात प्रमाणापेक्षा जास्त आम्ल (आंबट द्रव) तयार होणे, हे आम्ल अन्न पचनासाठी अत्यंत आवश्यक असते. परंतु, त्याचं प्रमाण वाढल्यास आम्लपित्त अथवा अँसिडिटीचा त्रास सुरू होऊ शकतो. आम्लपित्त वाढल्यावर बऱ्याचदा जळजळ होणं, चक्कर येणं, अस्वस्थ होणं अशा अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे पित्ताचा त्रास टाळायचा असेल तर काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे पित्ताचा त्रास टाळायचा असेल तर या गोष्टींकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे.

पित्ताचा त्रास टाळण्यासाठी उपाययोजना

१ भूक नसल्यास विनाकारण जेवणं करणं टाळा.

२. सकस आहाराचं सेवन करा.

३. शक्यतो ताजी फळे, भाज्या आणि कडधान्य यांचं समावेश करा.

४. भरपूर पाणी प्या.

५. सोयाबीन, डाळी अशा फायबरयुक्त पदार्थ खा.

६. अनेक जणांना कंटाळा आल्यानंतर फास्टफूड किंवा चटपटीत पदार्थ खाण्याची सवय असते. मात्र ती टाळावी.

७. जंकफूड, मसाल्याचे पदार्थ यांचं सेवन टाळा.

८. झोपेपूर्वी टीव्ही पाहणे, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स वापरणं किंवा कँफिनेटेड पेय पिणं टाळा

९. नियमित व्यायाम करा. (पोहणे, नृत्य, योगा, धावणं, एरोबिक्स किंवा जॉगिंग)

१०. खाल्ल्यानंतर लगेचच अंथरूणात झोपणं टाळा

११. मद्यपान आणि धुम्रपान यांसारख्या व्यसनापासून दूर रहा.

१२. कांद्याचा रस किंवा टोमॅटोचा रस पिऊ नका किंवा कच्चा कांदा देखील खाऊ नका.

१३. जेवणाच्या वेळा निश्चित करा, रात्रीअपरात्री खाण्याची सवय टाळा

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post