पायाच्या भेगा त्रासदायक ठरतात? करा ‘हे’ घरगुती उपाय


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अनेकदा ऋतू बदलला की शारीरिक व्याधी डोकं वर काढू लागतात. यामध्येच हिवाळा सुरु झाल्यावर अनेकांच्या पायांना भेगा पडतात. थंडीच्या दिवसांमध्ये पायांची त्वचा रुक्ष होत असते. त्यामुळे मग पायांना भेगा पडणं, त्यातून रक्त येणं अशा अनेक समस्या जाणवायला लागतात. इतकंच नाही तर सतत पाण्यात किंवा चिखलात काम केल्यामुळेदेखील ही समस्या निर्माण होते. त्यामुळे ही समस्या टाळण्यासाठी काही घरगुती उपाय करणं फायदेशीर ठरतं. चला तर मग जाणून घेऊया पायांना पडलेल्या भेगा दूर करण्याचे काही घरगुती उपाय.

१. रात्री झोपण्यापूर्वी पायांना तेल लावून झोपा.

२. थंडीच्या दिवसांमध्ये एरंडेल तेल, गुलाबपाणी आणि लिंबाचा रस समप्रमाणात घेऊन तो टाचांना लावा. हा प्रयोग दिवसातून दोन वेळा करावा.

३. पेट्रोलियम जेली किंवा दुधावरील साय जरी भेगांवर लावली तरी त्रास कमी होतो.

४. साखर आणि साय यांच्या मिश्रणाने टाचांवरील भेगांवर साखर विरघळेपर्यंत चोळून घ्यावे, यामुळे देखील भेगा लवकर कमी होतात.

५. टाचांवर कांद्याचा रस लावा.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post