जखमेचे काळे डाग घालवण्याच्या सोप्या पद्धती


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

कधी काम करताना, कधी खेळताना तर कधी एखाद्या अपघातामुळे आपल्या चेहऱ्यावर आणि अंगावर जखमा होतात. ही जखम भरुन येण्यास ठराविक काळ जावा लागतो. मात्र, कधीकधी ही जखम बरी झाली तरी त्याचा डाग तसाच राहतो. शरीरावर राहिलेल्या या डागामुळे आपली चिडचिडही होते. कधी एखाद्या कार्यक्रमाला जाताना तर या डागाचे काय करावे असे होते. मग आपण डॉक्टरकडे किंवा पार्लरमध्ये जाऊन काही उपाय करून पाहतो. मात्र, या सगळ्यात बरेच पैसे खर्च होतात. पण याआधी काही घरगुती सोपे उपाय करुन पाहिल्यास त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो. काय आहेत या टिप्स पाहूया..

१. लिंबू आणि टोमॅटोचा रस
लिंबू आणि टोमॅटो हे आपल्या घरात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टी आहेत. जखम थोडीशी बरी झाल्यानंतर हा उपाय करु शकता. साध्या पाण्याने जखमेचा भाग धुवून घ्या. त्यावर ओला आणि स्वच्छ कपडा ठेवा. काही तासाने ताज्या लिंबाच्या रसात बुडवलेले कापड या जखमेवर ठेवा. त्वचा सुकल्यानंतर तुम्ही त्यावर टोमॅटोचा रसही लावू शकता. असे दिवसातून दोन वेळा केल्यास जखमेचा डाग कमी होण्यास मदत होईल. लिंबातील अ‍ॅसिडिक घटक नैसर्गिकरित्या व्रणांचे डाग कमी करतात तर ताज्या टोमॅटोच्या रसामध्ये ब्लिचिंग घटक असल्याने व्रण कमी होण्यास मदत होते.

२. बदामाचं तेल
बदामाचं तेल जखमेवर लावल्यास तुम्हाला त्यापासून लवकर आराम मिळेल. दिवसातून दोनदा हे तेल जखमेवर लावून हलका मसाज करावा.

३. मेथी व हळद
मेथीचे दाणे रात्रभर भिजवून सकाळी त्याची पेस्ट बनवा. तयार पेस्ट जखमेवर लावा व पूर्ण सुकल्यावर थंड पाण्याने स्वच्छ धुवा. मेथीप्रमाणेच हळदीची पेस्ट बनवून लावल्यास जखम लवकर भरण्यास तसेच व्रण दूर होण्यास मदत होते.

४. बटाट्याची सालं
बटाट्याच्या सालांमध्ये अ‍ॅन्टी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे जखम लवकर बरी होते. यासाठी बटाट्याची साल काढून ती जखमेवर लावा. मात्र ही सालं स्वच्छ धुवून घेतलेली असायला हवीत.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार किंवा उपाय करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post