मन एकाग्र व स्थिर ठेवण्यासाठी काय करावे?


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

मन चंचल आहे, हे प्रत्येकालाच ठाऊक आहे. मन हे आपल्याला प्रत्येक त्या मोठ्या गोष्टीकडे वळवतं, ज्या केल्यानंतर आपल्याला काही वेळाकरीता सुख मिळतं. खरं तर आपलं मन जसं आपल्याला वळवतं तस आपण वळतो आणि जगातील सगळ्यात कठीण आणि सध्याच्या परिस्तितीत आवश्यक गोष्ट म्हणजे आपलं मन हे स्थिर ठेवणे. हे नेमकं कस शक्य आहे, पाहुयात याबाबतची माहिती..

प्रत्येक चांगल्या गोष्टीकरिता एक कालावधी लागतो आणि त्या करिता आपल्याला 'साधना' करावी लागते. जर आपल्याला मन स्थिर करायचं असेल तर आपल्याला साधना, सत्संग आणि सेवा करणे अत्यंत आवश्यक आहे.

आता 'साधना' म्हणजे नेमकं काय? ती कशी करावी? हे पाहू. साधना म्हणजे एखाद्या सकारात्मक गोष्टीचा दृढ निश्चय आणि त्यामध्ये नियमितता. यात तुम्ही योग, प्राणायाम आणि ध्यान करू शकता. हल्ली योग आणि प्राणायामबद्दल काही खास सांगावं लागत नाही. पण आपल्याला विशाल गोष्टीकडून सूक्ष्मकडे वळायचं आहे. तेव्हा आपलं मन स्थिर होईल, त्या करिता योगा आणि प्राणायाम सोबत ध्यान करणेही तितकेच गरजेचे आहे.

ध्यान करणे म्हणजे काय ? नेमकं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण अगदी सोपं आहे ध्यान करणे म्हणजे काहीच न करणे इतकं सोपं आहे ध्यान करणं. घरातील एखाद्या शांतता असलेल्या जागी पाठीचा कणा ताठ ठेऊन बसने आणि हात गुढघ्यानवर ठेऊन तळवे आकाशा कडे ( कोणत्याही प्रकारच्या मुद्रा उदा. चीन किंवा चिन्मय मुद्रा लावण्याची काही ही गरज नाही ) सुरवातीला तीन वेळा ओंम चा उच्चार करणे आणि 10 ते 20 मिन बसून राहणे मना मध्ये कोणते पण विचार येत असल्यास त्याचा स्वीकार करणे त्याच्यावर लक्ष्य न देता त्यांचा स्वीकार करणे, आजू बाजू च्या परिसरात जर कुठले आवाज येत असल्यास त्यांचा पण स्वीकार करणे, विचार येतच असतात ते त्यांचं काम आहे. 10 ते 20 मिन च्या ध्यान मुळे तुम्हाला एकदम सुंदर असा स्थिरतेचा अनुभव येईल, आणि जर हेच तुम्ही नेहमी साठी केलं तर तुमचं आयुषा मध्ये खूप काही बदल घडतील.

जर तुम्हाला कोणते शिबीर करायचे असल्यास तुम्ही सुरवातीला आर्ट ऑफ लिविंग चा हॅपिनेस प्रोग्रॅम करू शकता मी सुद्धा केला आहे त्या मध्ये तुम्हला योग प्राणायाम सुदर्शन क्रिया आणि ध्यान शिकवल्या जाते आणि सोबतच काही ज्ञान च्या गोष्टी शिकवल्या जातात नक्कीच ह्या सुद्धा तुम्हाला तुमचा मन स्थिर करायला मदत करतील.

साधना तर झाली आता सोबतच सत्संग आणि सेवा पण तेवढीच महत्वाची सत्संग मध्ये तुम्ही भजन किंवा चांगल्या गोष्टी ऐकू शकता ज्या मुळे तुमच्या मना मध्ये स्थिरता येते आणि सेवा केल्याने तुम्हाला एक विशिष्ट प्रकारच समाधान मिळेल जे की कोणत्याच गोष्टी केल्यावर मिळणं संभव नाही.

(कोरा या संकेतस्थळावर अक्षय लखदीवे यांनी ही माहिती दिली आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post