अस्सल कोल्हापुरी चप्पल कशी ओळखावी?

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज


अस्सल कोल्हापुरी चप्पल ओळखायचे काही ठोकताळे पाहूया..

१) वास (Smell) :- बहुतांशी लोकांनी आपल्या आयुष्यात कधी ना कधी चामड्याची वस्तू हि नक्कीच वापरलेली असते. तुमच्या लक्षात आले असेल कि चामड्या ला एक विशिष्ट असा वास हा नेहमीच येत राहतो. तुम्ही अस्सल कमरेला लावायचे पट्टे हुंगून पहा अथवा चामडी घड्याळचा पट्टा देखील, याचा विशिष्ट हा वास कधीच जात नाही. चामड्यावर खूप काही प्रक्रिया होतात. सुरवातीच्या प्रक्रियेमध्ये खूपच उग्र वास असतो. त्याला त्या झाल्यावर त्याची कार्यक्षमता आणि वापरकाल छान वाढवला जातो. नंतर त्याचा वास कमी आणि सौम्य होण्यासाठी देखील त्यावर काम केले जाते आणि मगच ते बाजारामध्ये उतरले जाते .

इथे तुमचा पहिला ठोकताळा आहे. डुप्लिकेट चामड्याचा अथवा चामडे सदृश रेक्सिनचा वास हा अति सौम्य अथवा जवळपास नसतोच. तरी डुप्लिकेट चप्पल बनवणारे त्याला अस्सल चप्पल बनवताना वापरलेला ब्रश वापरून वास द्यायचा प्रयत्न करतातच. त्यावेळी तुम्ही थोडा दोन चामड्याच्या थरांमधील फटीमध्ये वास घेऊन तपासू शकता.

यामध्ये अप्पर बॉटम आणि लोवर बॉटमच्या मधल्या जागेत थोडासा हुंगून पहा. कळून येईल. (हि १००% विश्वासार्ह्य पद्धत नाहीये, पण खूप अंशी तुम्ही डुप्लिकेट चप्पल पकडू शकता.)

2) दर्जा :- डुप्लिकेट चप्पल हे हलक्या दर्जाच्या चामड्यापासून देखील बनवले जाते ..! हे तेच चामडे असते ते प्रोसेससिंग मधून दुय्यम दर्जाचा अथवा खराब माल म्हणून बाहेर काढले जाते ..! डुप्लिकेट चप्पल बनवणारे हा माल स्वस्तात विकत घेऊन याची चप्पल तुमच्या गळ्यात मारू शकतात. हलके चामडे हे डागळलेले असते. कधी कधी त्यावर गोल काळे डाग असतात. त्यावर तुम्ही जवळून पाहाल तर दुय्यम दर्जा आहे ते लक्षात येते.

या उपर दुय्यम चामडे ओळखायचे खूप कमी ठोकताळे आहेत. कारण ते दिसायला जवळपास प्रथम दर्जाच्या चामड्या सारखेच दिसते. वास पण सेम असतो. पण तुम्हाला चांगले चामडे कसे असते हे माहित असेल तर तुलनेने तुम्ही दुय्यम चामड्याची चप्पल सहज ओळखू शकाल. दुय्यम चामड्याला छिद्रे वैगेरे असतात त्यामुळे त्याला बाहेर काढले जाते. कधी कधी डुप्लिकेट चप्पल बनवणाऱ्यांच्या नजरचुकीने हि छिद्रे चप्पलवर पण दिसतात. याने तुम्ही ओळखू शकाल.

3) शिवण (Stitch) :- बहुतेक कोल्हापुरी चप्पल.. नव्हे तर जवळपास सर्वच अस्सल कोल्हापुरी चप्पल हि हाताने बनवलेली असतात. त्याची शिवण, त्याची वीण, त्याचे काठ हे सर्व काम हाताने म्हणजे पूर्णतः हॅन्डमेड असते. त्यामुळे एक्दम परफेक्ट शिलाई, एक्दम सुबक कट केलेले काठ, परफेक्ट समांतर वीण असेल तर कदाचित हि चप्पल डुप्लिकेट असू शकते. "कदाचित" हे यासाठी म्हणत आहे कारण या चप्पल बनवण्याच्या कामामध्ये वर्षानुवर्षे काम करून खूपसे कारागीर एवढे पारंगत होतात कि त्यांच्या हाताची शिलाई पण मशीन सारखी परफेक्ट होते. त्यामुळे हा ठोकताळा थोडासा जपून चेक करा.

4) विक्रेता :- कोल्हापूर मध्ये काही काही ठिकाणे अशी आहेत जिथल्या दुकान मध्ये तुम्ही डोळे झाकून खरेदी करू शकता ..! म्हणजे असा सार्थ विश्वास त्या दुकानदारांनी उभारला आहे त्या क्षेत्रात..! त्यांना चप्पल च्या विक्री पेक्षा आणि स्वतःचे नाव चप्पल च्या व्यवसायामधें जपायचे असते त्यामुळे अशा दुकानात तुम्ही जाल तर तुमची फसवणूक कधीच नाही होणार ..! उलट चांगली, वाईट चप्पल कोणती याबद्दल चांगला सल्ला देखील मिळेल ..!

पण समझा नवीन आणि अनोळखी दुकानात गेला तर..
त्या विक्रेत्यांशी सहज बोलता बोलता ..चप्पल कशी बनते ?? काय काय प्रोसिजर ?? किती वर्ष काम करता ?? कोण कोणत्या प्रकारच्या चप्पल असतात ?? हाताने बनते कि मशीन वर ?? अशा गोष्टी बोलत चला.. जर या प्रश्नांची उत्तरे तो विक्रेता न अडखळता, न थांबता सहजपणे देऊ शकला तर तो विश्वासू माणूस आहे असं मानून चप्पल घ्यायला हरकत नाही! पण जर उडवा उडवी करू लागला अथवा प्रश्नाकडे दुर्लक्ष करू लागला तर तुम्ही तिथून काढता पाय घ्यावा हे बरे..!

(इथे पण सराईत लोक तुम्हाला फसवू शकतात त्यामुळे जरा सावध असावे )

5) वजन/ मजबूती / कुशलता :- कोल्हापुरी चप्पल हि भरीव कामामुळे वजनदार असते. तसेच हातात घेतली कि इतर कोणत्याही पादत्राणांपेक्षा जड लागते. डुप्लिकेट चप्पल हि दुय्यम चामड्यामुळे आणि अकुशल कामामुळे वजनाला तुलनेने हलकी असते.

'या' फरकामुळे पण तुम्ही अस्सल आणि नकली मधील फरक सहज ओळखू शकाल!

असली चप्पलच्या टाचा, अंगठे हे भयंकर मजबूत असतात. सहज हाताने खेचून पाहाल तरी त्याची मजबूती जाणवते. तोच नकली चप्पलचे अंगठे खेचून पाहता आता तुटून निघतात कि काय असं वाटत. हा पण ठोकताळा खूपच प्रभावी आहे.

तसेच असली चप्पल वरची कलाकुसर खूपच बारीक आणि प्रभावी असते. अगदी गोंड्याच्या वेण्या देखील खऱ्या खुऱ्या केसाच्या वेण्या जशा असतात ताशा आकर्षक दिसतात.

डुप्लिकेटमध्ये हेच काम अकुशलतेने म्हणजेच "लाव लेजावं टिमकी बजाव" अशा पद्धतीचे असते.

(कोरा या संकेतस्थळावर सुरज गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post