लाचखोरीत आशिया खंडात भारताचा क्रमांक पहिला?

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

सरकारी कार्यलयात लाच घेऊन काम करून घेण्यात भारताचा आशिया खंडात पहिला क्रमांक आहे. देशात आपले काम करून घेण्यासाठी कुठल्याही स्वरुपात लाच द्यावी लागते, अशी कबुली सर्वेक्षणात सामील झालेल्या नागरिकांनी दिली आहे.

ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने बुधवारी एक अहवाल जारी केला आहे. त्यानुसार जपानमध्ये सर्वाधिक कमी लाचखोरी आहे. आशियात भारतानंतर कंबोडिया आणि इंडोनेशियाचा क्रमांक लागतो. लाचखोरीत जरी भारत आघाडीवर असला तरी पुढील काही काळात ही परिस्थिती सुधरेल अशी बहुतांश लोकांना आशा आहे.

ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार 39 टक्के भारतीय नागरिकांनी कबुल केले की आपले काम करण्यासाठी लाच द्यावीच लागले. कंबोडियात हा दर 37 तर इंडोनेशियात हा दर 30 टक्के आहे.

2019 मध्ये भ्रष्टाचारमध्ये जगात भारताचा 80 वा क्रमांक होता. ट्रान्सपरसी इंटरनॅशननुसार भारताचा जगात 41 वा क्रमांक आहे. तर म्यानमरचा 130वा पाकिस्तानचा 120 क्रमांक असून नेपाळचा 113वा क्रमांक लागतो.

पोलिसांमध्ये लाच घेण्याचे प्रमाण सर्वाधिक

अहवालानुसार पोलीस आणि स्थानिक अधिकारी सर्वाधिक लाच घेतात. त्याचे प्रमाण 4६ टक्के इतके आहे. त्यानंतर खासदारांचा क्रमांक लागतो. देशातील 42 टक्के लोकांना असे वाटते की खासदार जास्त लाच घेतात. 41 टक्के लोकांना वाटते की सरकारी नोकर हे लाच घेण्यात सर्वात पुढे असतात.

Post a Comment

Previous Post Next Post