हिमोग्लोबीन कमी आहे? वाढविण्यासाठी 'हे' पदार्थ खावेत


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

हिमोग्लोबिन हे लाल रक्तपेशीमध्ये असणारे द्रव्य आहे. त्याची कमतरता दूर करण्यासाठी काही खाद्य पदार्थ फायदेशीर ठरू शकतात. याबाबत माहिती घेऊ.

१. शेंगदाणा + गुळ लाडू

२. तीळ+ गुळ लाडू

३. फुटाणे + गुळ

४. अहलीव खीर

५. भिजलेले हिरवे मूग

६. कुलथीची उसळ, भाजी, वरण

७. बाजरीची भाकरी

८. उडीळाची भाकरी, वरण, लाडू

९. राजगिरा भाजी ( लाल भाजी/ लाल माठ)

१०. डाळिंबाचा रस

११. सिताफळ, सफरचंद

१२. आवळा रस, चूर्ण

१३. बीट रस / पराठे

१४. पेंदखजूर, अंजीर, काला मनुका

१५. गाजर

१६. टमाटर

१७. अंडी, मासे, मटण

१८. लोखंडाच्या कढईत भाज्या बनवाव्यात. म्हणजे कढईतले लोहसुद्धा अप्रत्यक्षपणे शरीरात जाईल.

वरील सर्व धान्य, भाज्या, फळे हे लोहाचे उत्तम स्त्रोत आहेत. त्यामुळे यांचा उपयोग हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी होतो व दररोजच्या आहारामध्ये हे पदार्थ आलटून पालटून घेतले तर हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण होणार नाही.

तसेच आपल्याला जे खाद्यपदार्थ लालसर रंगाची दिसतात, त्या सर्वांमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते आणि रक्ताचा रंगही लालच असतो. त्यामुळे लाल पदार्थ सेवन केले, तर आपोआपच रक्तातील हिमोग्लोबिन वाढेल. पण हिमोग्लोबिन जर ७-८ ग्रॅम पेक्षा कमी असेल तर डॉक्टरांचाच सल्ला घ्यावा.

(कोरा या संकेतस्थळावर शुभांगी क्षीरसागर यांनी ही माहिती दिली आहे. कोणतेही उपचार वैद्यकीय सल्ला घेऊनच करावेत.)

Post a Comment

Previous Post Next Post