पवार फॅक्टर अमेरिकेतही ठरला प्रभावी : जितेंद्र आव्हाड

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

चार दिवस चाललेल्या मतमोजणीनंतर अखेर जो बायडन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला. विद्यमान अध्यक्ष, रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांना चीतपट करून डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन अमेरिकेचे ४६वे अध्यक्ष म्हणून निवडून आले. बायडन यांच्या विजयानंतर राष्ट्रवादीचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत भाष्य केलं आहे.


अमेरिकेत चार दिवसांपासून सुरू असलेल्या मतमोजणीकडे संपूर्ण जगाचे लक्ष होते. अखेर बायडन यांनी विद्यमान अध्यक्ष, रिपब्लिकन पक्षाचे ट्रम्प यांना पराभूत केले. बायडन यांना २७३, तर ट्रम्प यांना २१४ मते पडली. बायडन यांना ५०.५ टक्के म्हणजे ७४४७८३४५ मते, तर ट्रम्प यांना ४७.७ टक्के म्हणजे ७०३२९९७० मते मिळाली आहेत. पेनसिल्वेनियात अखेर बायडन यांनी ट्रम्प यांना पराभूत केले आहे.

निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा साताऱ्यातील पावसातील सभेचा फोटो व बायडन यांचा फ्लोरिडातील फोटो ट्विट केला आहे. त्याचबरोबर या फोटोवर आव्हाड यांनी भाष्यही केलं आहे.

“पवार साहेब फॅक्टर अमेरिकेत सुद्धा यशस्वी ठरला आहे. अखंडपणे केलेले कठीण परिश्रम व वचनबद्धताच विजयी ठरते. आशा जिवंत आहेत,” असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post