कारल्याच्या रसाचे ‘हे’ फायदे माहिती आहेत का?

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

घरात आईने कारलं हे नाव जरी उच्चारलं तरी अनेक जणांच्या कपाळावर आठ्या पडतात. लहान मुलं तर नाक मुरडतात. मात्र चवीने कडू असणाऱ्या कारल्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळेच आयुर्वेदातही कारल्याला अत्यंत महत्वं आहे.म्हणूनच कारलं कितीही नावडतं असलं तरीदेखील आपल्या आहारात त्याचा समावेश केलाच पाहिजे. तसंच कारल्याचा रस पिण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे आठवड्यातून किमान एकदा तरी कारल्याचा रस प्यायला हवा.

कारल्याच्या रसाचे फायदे

१. कारल्याच्या रसामुळे रक्तशुद्ध होते. त्यामुळे त्वचा विकार होण्याचा धोका कमी होतो.

२. कावीळ झाल्यानंतर ताज्या कारल्याचा रस काढून तो सकाळ, संध्याकाळ घेतल्यास कावीळ दूर होते.

३. यकृताच्या सर्व विकारांमध्ये कारल्याचा रस फायदेशीर असतो.

४. पोटात जंत झाल्यास कारल्याचा रस फायदेशीर ठरतो. पोटात कृमी किंवा जंत झाल्यास कारल्याचा रस प्यावा.

५. दमा, सर्दी, खोकल्याचा त्रास असेल तर कारल्याचा रस व तुळशीच्या पानांचा रस एकत्र करून त्यात मध मिसळून महिनाभर घेतल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढून हे त्रास दूर होतात.

६. कारले हे शक्तीवर्धक आहे म्हणून लहानमुलांच्या आहारातही कारल्याचा समावेश आवर्जून करावा.

कारल्याचा रस तयार करण्याची पद्धत
१ -२ मोठी कारली, १ मोठा चमचा लिंबाचा रस, १ मोठा चमचा काळं मीठ, १ चमचा चिंचेची पेस्ट, १ चमचा जीरा पावडर.

कृती
कारल्याचा रस तयार करण्यासाठी १-२ कारल्यांना मीठ चोळून अर्धातास ठेवावं. त्यानंतर कारले स्वच्छ धूवुन त्याची पेस्ट तयार करावी. या तयार पेस्टमध्ये संत्र्याचा रस मिक्स करावा. त्यानंतर पुन्हा एकदा हे मिश्रण मिक्सरमधून वाटून घ्यावं, मग हा रस गाळून घ्यावा. गाळलेल्या रसामध्ये लिंबाचा रस, काळं मीठ, चिंचेची पेस्ट टाकून सगळं व्यवस्थित हलवून मिक्स करावं. हा रस रोज सकाळी अनेशापोटी प्यावा.

Post a Comment

Previous Post Next Post