संधिवातापासून ते पोटदुखीपर्यंत मोहरीचे अनेक फायदे

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

कोणत्याही मसालेदार, तिखट पदार्थाची चव वाढवायची असेल तर त्यावर तडका हा हवाच. अर्थात तडका म्हटलं की डोळ्यासमोर पटकन कडकडीत तापलेल्या तेलाची आणि मोहरीची फोडणी येते. त्यामुळे स्वयंपाकघरात मोहरीचं किती महत्व आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. परंतु, मोहरी केवळ पदार्थाची चव वाढविण्यासाठीच उपयोगी नाही. तर तिचे अन्यही काही फायदे आहेत. त्यामुळे मोहरी खाण्याचे नेमके फायदे काय हे जाणून घेऊयात.

१. अपचन, पोटदुखी, अजीर्ण झाल्यास मोहरीचे चूर्ण आणि खडीसाखर एकत्र करुन पाण्यासोबत घ्यावी. त्यामुळे पोटाचे विकार किंवा अन्य समस्या दूर होतात.

२. तीव्र ताप, सर्दी, कफ झाल्यास मोहरीचे चूर्ण आणि मध एकत्र करुन ते चाटण घ्यावे.

३. पायात काटा किंवा काच गेल्यास त्या जागेवर मोहरीचं चूर्ण, तूप आणि मध एकत्र करुन त्याचा लेप लावावा.

४. संधिवातात हात-पाय दुखत असल्यास एरंडाच्या पानाला मोहरीचं तेल लावून ते पान गरम करुन दुखत असलेल्या भागावर बांधून ठेवावं.

५. दातदुखी, दात किडणे अशा समस्येवर गरम पाण्यात मोहरी उकळून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात. त्यामुळे दातातील कीड मरते.तसंच हिरड्या मजबूत होतात.

६. खाज, खरूज किंवा अन्य त्वचाविकार झाल्यास गोमूत्रामध्ये मोहरी वाटून त्यात थोडी हळद मिक्स करावी. हा लेप प्रभावित जागेवर लावावा. त्यानंतर थोड्या वेळाने हा लेप पाण्याने धूवुन टाकावा.

७. चामखीळ, मस असल्यास त्या जागी मोहरीचे तेल नियमित लावावे. चामखीळ, मस गळून पडतात.

८. मासिक पाळी नियमित येण्याकरता मोहरीचे चूर्ण घेत राहावे.

९. अर्धशिशी, मस्तकशूळ उठल्यास मोहरी बारिक वाटून त्याचा लेप लावावा. यामुळे मायग्रेनचा त्रास असल्यास तो देखील बरा होतो.

१०. कान दुखत असल्यास मोहरीचे तेल गरम करून त्याचे दोन थेंब कानात टाकावे.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)


Post a Comment

Previous Post Next Post