पाकिस्तानात उत्खननात सापडले 1300 वर्षांपूर्वीचे विष्णू मंदिर

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

वायव्य पाकिस्तानातील एका प्रांतात सुमारे 1300 वर्षांपूर्वीचे विष्णूमंदिर सापडले आहे. पाकिस्तानातील स्वात प्रांतातील डोंगराळ भागात उत्खननादरम्यान प्राचीन विष्णू मंदिराचे अवशेष सापडले आहेत. याआधीही पाकिस्तानातील विविध भागात प्राचीन मंदिराचे आवशेष सापडले होते. मात्र, स्वात भागात पहिल्यांदाच सुमारे 1300 वर्षांपूर्वीच्या मंदिराचे अवशेष सापडले आहेत.

पाकिस्तानी आणि इटलीच्या पुरातत्व संशोधकांना स्वात प्रांतातील डोंगराळ भागात उत्खनन करताना 1300 वर्षांपूर्वीच्या मंदिराचे अवशेष आढळले. प्राचीन काळातील हिंदू राजांनी बांधलेले हे विष्णू मंदिर असल्याची माहिती संशोधकांनी दिली. स्वात प्रांतात सापडलेल्या या मंदिराबाबत गुरुवारी संशोधकांनी माहिती दिली आहे. हिंदू राजवटीच्या काळात 1300 वर्षापूर्वी या मंदिराची निर्मिती करण्यात आली होती, असे खैबर पख्तूनखवाचे पुरातत्व विभागाचे अधिकारी फजले खलीक यांनी सांगितले.

काबुल खोरे (आताचे अफगाणिस्तान), गांधार ( आताचे कंधाहार) पाकिस्तानातील काही भाग आणि वायव्य हिंदुस्थानात काबुल शाहीस या हिंदू राजवंशाने ईसवीसन 852 ते 1026 या काळात राज्य केले. या राजवंशाच्या काळात 1300 वर्षांपूर्वी या विष्णू मंदिराची निर्मिती करण्यात आली असावी, असे संशोधकांनी सांगितले.

उत्खननादरम्यान संशोधकांना मंदिराजवळ पाण्याची टाकीही आढळली आहे. मंदिरात दर्शनापूर्वी स्नान करण्यासाठी आणि पूजेसाठी या पाण्याचा वापर करण्यात येत असावा, असे संशोधकांनी सांगितले. याआधीही स्वात जिल्ह्यात अनेक प्राचीन काळातील वास्तूंचे अवशेष सापडल्याचे खलीक यांनी सांगितले. स्वात जिल्ह्यात बौद्ध धर्मियांची अनेक प्राथर्नास्थाळेही आढळली आहेत. मात्र, या भागात हिंदू राजवटीतील मंदिराचे अवशेष प्रथमच सापडले आहेत, असे इटलीचे पुरातत्त्व संशोधक डॉ. लुका यांनी सांगितले. हिंदू राजवटीतल्या काळात 1300 वर्षांपूर्वी या मंदिराची निर्मिती करण्यात आल्याचे लुका यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post