रुग्णांना पैसे परत मिळवून दिले.. भुतारे झाले करोना योद्धा


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

खासगी हॉस्पिटलचे वाढीव बील रुग्णांना परत मिळवून दिल्याबद्दल तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजना पाठपुरावा करून लागू केल्याने गरिब तसेच सर्वसामान्य शेकडो कोरोना रुग्णांचे खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार मोफत झाल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांना कोरोना योध्दा पुरस्कार देऊन नुकतेच गौरवण्यात आले. माळीवाड्यातील गोरे डेंटल हॉस्पिटलद्वारे त्यांचा हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

माळीवाडा येथील गोरे डेंटल हॉस्पिटलच्यावतीने कोरोना योद्धयांचा सत्कार डॉ. संजय पुंड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गोरे डेंटल हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुदर्शन गोरे व डॉ. केतन गोरे तसेच कोरोना योद्धे डॉ. सतीश राजूरकर, बूथ हॉस्पिटलचे मेजर देवदान कळकुंबे, डॉ. अभिजीत शिंदे, डॉ. महेश कोकाटे, डॉ. राजेंद्र आव्हाड, केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता गाडळकर, साईनाथ घोरपडे, मनसेचे नितीन भुतारे, रोहन डागवले, नितीत डागवाले उपस्थित होते.

कोरोना विषाणू संकटाच्या काळामध्ये डॉक्टर्स व विविध सामाजिक संघटनांचे मोलाचे योगदान आहे. कोरोनामुळे अनेकांचा मृत्यू झाला, ही बाब दुर्दैवी आहे. मात्र, आता कोरोनाबाबत जनजागृती झाली असून लोक खबरदारी घेत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला असून मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे, असा दावा यावेळी करण्यात आला. गोरे डेंटल हॉस्पिटलने सकारात्मक दृष्टीकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासत डॉक्टर्स व विविध सामाजिक संघटनांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव केल्याचे गौरवोदगार यावेळी व्यक्त करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post