एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
नगरचे महापौर सांगतात फटाके वाजवू नका, प्रदूषण मुक्त दिवाळी साजरा करा. दुसरीकडे बिहार निवडणूकीमध्ये कसे बसे यश मिळाले आणि त्याचा जल्लोष म्हणून नगरमध्ये भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष, उपमहापौर व इतर सर्व पदाधिकारी फटाके वाजवून जल्लोष साजरा करतात. त्यामुळे भाजपच्या फटाक्यांनी प्रदूषण होत नाही का महापौर साहेब? असा सवाल करत मनसेच्या परेश पुरोहित यांनी प्रत्युत्तर दिले आहे. स्वतःचं ते पोरगं अन् दुसऱ्यांचं कारटं, अशी भाजपाची गत झाल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
नगरमध्ये खड्ड्यांचे साम्राज्य आहे. रस्त्यावर धुळीमुळे अनेकांना त्रास होतो आहे. अनेकांना श्वसनाचे आजार जाडलेत. त्याकडे आधी लक्ष द्यावे. मी पगारी माणसांच्या टिकेला भिक घालत नाही. मी केलेली समाज उपयोगी कामे नगरकरांच्या समोर आहेत. मला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
Post a Comment