चमकदार त्वचेसाठी घरीच तयार करा मुगाच्या डाळीचा फेसपॅक


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

सुदृढ आणि निरोगी आरोग्य हवं असेल तर आहारात सर्व प्रकारच्या पालेभाज्या, कडधान्य, डाळी यांचा समावेश करायला हवा. मात्र अनेक वेळा कडधान्य म्हटल्यावर काही जण नाक मुरडतात. परंतु हे कडधान्य जसे आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. तसेच ते त्वचेसाठी देखील फायदेशीर असल्याचं पाहायला मिळतं. घराघरात सहज उपलब्ध होणारं कडधान्य म्हणजे मूग. या मुगापासून डाळदेखील तयार केली जाते. त्यामुळ अनेक जण मुगाची डाळीचं वरण , मुगाच्या डाळीची भाजी, डाळीपासून तयार केलेली भजी असे पदार्थ तयार करतात. विशेष म्हणजे पदार्थांमध्ये वापरली जाणारी ही मुगाची डाळ सौंदर्य वाढविण्यासाठी देखील वापरली जाते. मुगाच्या डाळीपासून फेसपॅक करता येतो हे फार कमी जणांना माहित आहे.

मुगाच्या डाळीच्या फेसपॅकचा फायदा

१. काळवंडलेली त्वचा उजळते.

२. चेहऱ्यावरील मृत त्वचा काढून टाकते.

३. उन्हामुळे स्कीन टॅन झाली असेल तर त्यापासून सुटका होते.

४. चेहऱ्यावर किंवा शरीरावर असलेले काही अनावश्यक केस काढण्यास मदत होते.

फेसपॅक करण्याची पद्धत

२ चमचे मुगाची डाळ घेऊन ती रात्रभर भिजत ठेवा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याची पेस्ट करुन घ्या. या पेस्टमध्ये १ चमचा बदामाचं तेल आणि १ चमचा मध मिक्स करा. त्यानंतर हा लेप चेहरा आणि मानेवर लावा. १५-२० मिनीटांनी लेप वाळल्यावर गार पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.

मुगाच्या डाळीत व्हिटॅमिन ए आणि सी चं प्रमाण जास्त असून त्याच्यात अॅक्सिफोलिएटचे गुणधर्म असतात. त्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो आणि चेहऱ्यावर चमक येते.मुगाच्या डाळीचा फेसपॅक करण्याच्या विविध पद्धती आहे. त्यामध्ये सहज सोपी आणि पटकन होणारी ही पद्धत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post