हाताच्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी नखांची घ्या ‘ही’ काळजी!


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

सुंदर दिसावं अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. त्यामुळे प्रत्येक स्त्री तिच्या केसांच्या आरोग्याकडे आणि चेहऱ्याकडे विशेष लक्ष देत असते. त्यामुळे बऱ्याच वेळा हे सौंदर्य जपण्यासाठी ती पार्लर किंवा महागडे सौंदर्यप्रसाधने यांच्यावर अमाप पैसा खर्च करते. परंतु, सौंदर्य जपण्यासोबतच हातापायांची काळजी घेणंदेखील तितकंच गरजेचं आहे.

अनेक वेळा आपण हातापायांच्या सौंदर्याची योग्य काळजी न घेतल्यामुळे किंवा नखांची योग्य निगा न राखल्यामुळे नखे तुटतात किंवा पिवळी पडतात. त्यामुळे नखांची काळजी घेणंदेखील तितकंच गरजेचं आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही महागड्या सौंदर्यप्रसाधनांची आवश्यकता नसून घरच्या घरी आपण नखांची काळजी घेऊ शकतो.

१. नखे नाजूक असल्यामुळे लवकर तुटत असतील तर रोज दुधाचं सेवन करा. दुधामुळे हाडे आणि नखे मजबूत होतात.

२. नखांना रात्री झोपण्यापूर्वी खोबऱ्याच्या तेलाने किंवा ऑलिव्ह ऑइलने हलक्या हाताने मसाज करा.

३. आहारात आर्यन, कॅल्शिअम, व्हॅटामिन बी अशा घटकांचा समावेश असलेल्या पदार्थांचं सेवन करा.

४. रात्री झोपण्यापूर्वी अॅटी-फंगल नेल ड्रॉप्स लावा.

५. कमी दर्जाच्या नेलपेंटचा वापर करु नका. तसंच वारंवार नेलपेंट लावू नका.

६. आठवड्यातून दोन वेळा कोमट पाण्यात हात-पाय बुडवून ठेवा.

Post a Comment

Previous Post Next Post