फळ पीक विम्याने शेतकऱ्यांची दिवाळी गोड; 8 हजार 300 शेतकर्यांना 36.92 कोटी मिळणार


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत हवामान आधारित फळ पीक विमा आंबिया बहार २०१९-२० मध्‍ये जिल्ह्यातील ८ हजार ३०१ शेतकऱ्यांना फळबागेचा 36 कोटी 92 लाख 91 हजार रुपयांचा विमाही मंजूर झाला असल्याची माहिती नगरचे खा.सुजय विखे यांनी दिली.

हवामानावर आधारित पंतप्रधान फळ पीक विमा योजनेत जिल्ह्यातील द्राक्ष, डाळींब, संत्रा, मोसंबी, केळी उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग घेवून आपले प्रस्ताव सादर केले होते. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीत मदतीचे पाठबळ शेतकऱ्यांना मिळावे म्हणून हवामानावर आधारित पीक विमा योजनेची सुरुवात करण्यात आली. जिल्ह्यात २०१९-२०२० या वर्षात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या फळबागांना या विमा योजनेचे संरक्षण कवच मिळाले असल्याचे खा.डॉ विखे यांनी सांगितले. या पीक विमा भरपाई योजनेनुसार जिल्ह्यातील २९७ द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना ७३ लाख, तर ६८५ डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना ३४ कोटी ८७ लाख मिळणार आहेत. ६५ आंबा उत्पादकांना २ लाख ९० हजार, तर ११०७ संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना १ कोटी १० लाख आणि १३० मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना ४ लाख ४५ हजार, तसेच ७७ केळी उत्पादक शेतकऱ्यांना १४ लाख ७० हजार रूपयांचा विमा मंजूर झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तालुकानिहाय मिळणारी ही भरपाई अशी- अकोले तालुक्यातील २६३ शेतक-यांनी या योजनेत सहभाग घेतला होता. त्यांना ९२ लाख २१ हजार रुपये मंजूर झाले. जामखेड तालुक्यातील ८२ शेतकऱ्यांना 48 लाख 66 हजार तर कर्जत तालुक्यातील ३६७ शेतकऱ्यांना २ कोटी ७ लाख, कोपरगाव तालुक्यातील ३२३ शेतकऱ्यांना १ कोटी १३ लाख, नगर तालुका २५८ शेतकऱ्यांना १ कोटी २४ लाख, नेवासा ३३० शेतकऱ्यांना २ कोटी २८ लाख, पारनेरमधील ४५० शेतकऱ्यांना २ कोटी २२ लाख, पाथर्डी तालुक्यातील २ हजार शेतकऱ्यांना ७ कोटी ४९ लाख, राहाता तालुक्यातील ४९६ शेतकऱ्यांना २ कोटी ४१ लाख, राहुरी तालुक्यात २९४ शेतकऱ्यांना १ कोटी ६० लाख, संगमनेर तालुक्यातील १ हजार ५०९ शेतकऱ्यांना ६ कोटी ३३ लाख, शेवगाव तालुक्यातील ३३३ शेतकऱ्यांना १कोटी ५० लाख, श्रीगोंदा तालुक्यातील १ हजार ४३९ शेतकऱ्यांना ६ कोटी ४४ लाख आणि श्रीरामपूर तालुक्यातील १४६ शेतकऱ्यांना ७५ लाख रुपयांच्या विमा रक्‍कमेस मंजुरी मिळाल्याने अडचणीत असलेल्या फळ उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे खा.डॉ.विखे म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post