सोरायटिक संधिवात म्हणजे काय? लक्षणे आणि उपाय


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

त्वचेशी संबंधित एक आजार म्हणजे सोरायसिस. या आजारामध्ये त्वचेवर पांढऱ्या रंगाचे चट्टे येणे, खाज सुटणे, त्वचेचा भूसा पडणे ही मुख्य लक्षणे दिसून येतात. या आजारामुळे अनेक जण त्रस्त असून वेळीच या आजाराकडे लक्ष न दिल्यास तो बळावण्याची शक्यता असते. यातलाच एक त्रासदायक प्रकार म्हणजे सोरायटिक संधिवात. त्याला सोरायटीक आर्थ्रायटीस (पीएसए) असंही म्हटलं जातं. यात सांध्यांमध्ये दाह होऊन प्रचंड वेदना होता.

सोरायटीक आर्थ्रारायटीची लक्षणे
१. सुजलेले किंवा ताठर सांधे.
२. स्नायूंमध्ये वेदना होणे.
३. हाताचे बोट, पायाचे बोट, मनगट, टाच आणि कोपर यामध्येही वेदना

उपचार पद्धती
१. योग्य जीवनशैली आणि संतुलित आहार (पीएसए) संधिवाताच्या रूग्णांसाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते.
२. नियमित व्यायाम अतिशय महत्त्वाचा आहे.
३. आहारात फळे, भाज्यांचा समावेश करावा.
४. गोडपदार्थ, मीठ, मेद वाढविणारे पदार्थ टाळावेत.
५. मानसिकरित्या स्ट्राँग रहावे.

या आजाराचे निदान कसे केले जाते?
सांध्याच्या समस्या किंवा ताठरतेच्या लक्षणांवर आधारित अशा काही चाचण्या करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. संधिवाताचा प्रकार ओळखण्यासाठी काही सामान्य चाचण्या केल्या जातात. जसे की, एक्स-रे आणि रक्त तपासणी ज्याद्वारे इरिथ्रोसाइट्स सेडीमेन्टेशन आणि सी-रिअँक्टिव्ह प्रोटीनची वाढलेली पातळी बघता येते.

सोरायसिस ही एक स्वयंप्रतिरोधक (ऑटो-इम्युन) आजाराची अवस्था आहे. तिचे लक्षणं म्हणून त्वचेवर परिणाम दिसून येतो. अनुवांशिकता, त्वचेतील जनुकीय दोषांमुळे सोरायसिसचा आजार होतो. यात त्वचेच्या पेशींची वाढ नेहमीपेक्षा झपाट्याने होते. या पेशी जुन्या पेशींची जागा घेतात. सोरायसिसच्या आजारात प्रत्येक ३-४ दिवसांत नव्या त्वचापेशी तयार होत असल्याने जुन्या पेशी काढून टाकण्यासाठी शरीराला पुरेसा वेळ मिळत नाही. यामुळे त्वचेच्या पृष्ठभागावर या अतिरिक्त त्वचेचा थर जमा होतो. यामुळे त्वचेला खाज सुटते. हा आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवणं गरजेचं आहे. याशिवाय या आजारावर प्रभावी थेरपी अतिशय फायदेशीर ठरू शकते. ही थेरपी करण्यासाठी कुठल्याही वयोमानाचे बंधन नाही.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post