राम्बुतान फळ खाण्याचे फायदे माहित आहेत का?

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

आरोग्यासाठी फळे ही सर्वात उत्तम हे आता सर्वानीच मान्य केले आहे. आंबा, सफरचंद, संत्री, केळी, किलगड अशा आपल्याकडच्या फळांचे गुण सर्वसाधारणपणे माहिती असतात. मात्र गेल्या दोनेक वर्षांत थायलंड- मलेशिया-चीनवरून येत असलेल्या विदेशी फळांनी बाजारात लक्ष वेधून घेण्यास सुरुवात केली आहे. ही फळे कोणी खावी, कोणी खाऊ नये याविषयी अनेकांच्या मनात शंका असतात. त्यांचे निरसन करण्याचा हा प्रयत्न. आज आपण राम्बुतान या फळाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

लाल रंग,केसासारखे काटेरी आवरण राम्बुतान या फळाला लक्षवेधी बनवते. हे मलेशियाचे फळ आहे.राम्बूत म्हणजे केस. भारतात हे फळ थायलंडमधून मे ते सप्टेंबरमध्ये येते. हे फळ आतून अगदी लीचीप्रमाणे रसाळ व पांढरे दिसते. आतील गर थोडा आंबट, गोड लागतो.

राम्बुतान हे एक औषधी फळ मानले जाते. लहान मुलामध्ये जंताची तक्रार असल्यास हे फळ गुणकारी आहे. राम्बुतानमध्ये कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असल्याने अस्थिरोगात पेशींचे निकामी होणे तसेच सूज कमी करते. इतर कुठल्याही फळापेक्षा या फळात तांब्याचे प्रमाण जास्त असल्याने केस गळण्याचे प्रमाण कमी करण्यास, तसेच केसांचा रंग गर्द करण्यास व कमी वयातच केस पांढरे होण्याची तक्रार कमी करण्यास फायदेशीर ठरते. या फळातील फॉस्फरसमुळे, रात्री पायात गोळे येण्याचा त्रास असलेल्या वृद्धांसाठी हे फळ खाण्याचा सल्ला दिला जातो.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post