एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
केळ-गुलाबपाणी
एक केळ मॅश करून त्यात गुला पाणी मिसळा. चांगल्यारीत्या मिसळून चेहर्यावर लावा. रात्रभर असेच राहू द्या. सकाळी कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाका.
दही-काकडी
काकडी आणि दही दोन्ही त्वचा उजळविण्यासाठी उत्तम पदार्थ आहे. 2 काकड्या बारीक वाटून घ्या. यात एक चमचा दही टाका. हा मास्क चेहर्यावर लावा. सकाळी कोमट पाण्याने धुऊन टाका.
लिंबू रस-मध
अर्धा चमचा लिंबाच्या रसात मध मिसळा. हे मास्क चेहरा आणि मानेवर लावा. सकाळी कोमट पाण्याने धुऊन टाका.
हळद-ऑलिव्ह ऑयल
अर्धा चमचा हळदीत एक चमचा ऑलिव्ह ऑयल मिसळा. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा. रात्रभर असेच राहू द्या. सकाळी कोमट पाण्याने धुऊन टाका.
मिल्क पावडर-बदाम तेल
अर्धा चमचा मिल्क पावडरमध्ये एक चमचा बदामाचे तेल मिसळा. चेहर्यावर लावून रात्र भर असेच राहून द्या.
स्ट्रॉबेरी-ग्रीन टी
एक स्ट्रॉबेरी क्रश करून घ्या. ग्रीन टी शिजवून गार करून यात मिसळून घ्या. त्वचेवर लावून रात्रभरा राहू द्या. सकाळी कोमट पाण्याने धुऊन टाका.
जिरं-टरबूज रस
एक वाटी पाणी भरून त्यात जिरे भिजवून ठेवा. जिरे वाटून त्यात टरबूज रस मिसळा. हे मिसळून चेहर्यावर लावा. रात्रभर असेच राहू द्या. सकाळी कोमट पाण्याने धुऊन टाका.
(कोरा या संकेतस्थळावर मानसी फुले यांनी ही माहिती दिली आहे. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)
Post a Comment