‘ही’ आहेत मधुमेहाची लक्षणे.. वेळीच घ्या डॉक्टरांचा सल्ला..


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

जगात मधुमेहींचा संख्या झपाट्याने वाढत आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेह होण्याच धोका वाढला आहे. सुखासीन जीवनशैली, बैठे काम, व्यायामाचा अभाव, जंक फूड यासारख्या सवयी मधुमेहाला निमंत्रण देत आहेत. कोरोनाच्या संकटात मधुमेहींना संक्रमणाचा जास्त धोका असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मधुमेहाची लक्षणे ओळखून ती दिसत असल्यास योग्यवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

मधुमेहींमध्ये शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. इतर आजाराप्रमाणे मधुमेहाची लक्षणे लगेच दिसत नसून लक्षणे दिसण्यास वेळ लागतो. त्यामुळे मधुमेहाचे योग्यवेळी निदान होत नाही. त्यामुळे वयाची चाळीशीनंतर दरवर्षी मधुमेहाची तपासणी करणे गरजेचे असते. भूक लागणे आणि थकवा जाणवणे ही मधुमेहाची प्रमुख लक्षणे आहेत. शरीरात इन्सुलीनचे प्रमाण कमी होत असल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. त्यामुळे सारखी तहान लागते आणि पेशींना ग्लुकोज मिळत नसल्याने सारखा थकवा जाणवतो.

भूक लगाण्याबरोबरच तहान लागणे आणि लघवीचे प्रमाण वाढणे ही देखील मधुमेहाची लक्षणे आहेत. इन्सुलीनच्या कमरतेमुळे पेशी रक्तीतील ग्लुकोज घेऊ शकत नाही, त्यामुळे ते किडणीद्वारे बाहरे फेकले जाते. त्यामुळे किडणीवर दबाव पडतो. त्यामुळे सारखे लघवीला जावे लागते. वारंवार लघवीला जावे लागत असल्याने तहान लागते आणि सारखे पाणी प्यावे असे वाटते. कितीही पाणी घेतले तरी तहान भागत नाही.

कितीही पाणी पिऊन समाधान होत नसल्याने घशाला कोरड पडते. तोंड कोरडे पडते. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने घशाला नेहमी कोरड जाणवते. तसेच शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचेला खाज येते. तसेच त्वचा शुष्क होऊन त्वचाविकार होण्याची शक्यता असते. खरचटणे किंवा भाजल्यास किंवा एखादी जखम झाल्यास ती भरण्यास वेळ लागतो. सांधेदुखीचा त्रास होण्यास सुरुवात होते. तसेच अनेकदा विविध आजारांचे संक्रमण होण्याचा धोकाही वाढतो.

शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने आणि रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याचा परिणाम डोळ्यांवरही होतो. शरीरातील साखर वाढल्यास अचानक धूरकट दिसू लागते. काहीजणांना डोळ्यांवर सूजही येते. मधुमेह झाल्यास शरीराला आवश्यक असलेल्या उर्जेचा पुरवठा आहारातून होत नाही. त्यामुळे वजन कमी होण्यास सुरुवात होते. अनेक रुग्णांमध्ये वजन कमी झाल्यानेच मधुमेहाचे निदान झाले आहे. तसेच अनुवंशिकतेमुळेही मधुमेह होण्याची शक्यता असते. त्यामुळे कुटुंबातील कोणाला मधुमेह असल्यास किंवा वरीलपैकी कोणतीही लक्षणे दिसत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि मधुमेहाची चाचणी करूनघेणे गरजेचे असते. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेत जीनवशैलीत काही बदल केल्याने मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते.

Post a Comment

Previous Post Next Post