SBI ने कोट्यवधी ग्राहकांना दिला 'हा' अलर्ट!

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

देशभरात बँकिंग फ्रॉडच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशाप्रकारची फसवणूक टाळण्यासाठी देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाकडून सतत आपल्या खातेधारकांना सतर्क राहण्याची सूचना केली जाते. आता पुन्हा एकदा एसबीआयने ट्विटरद्वारे आपल्या कोट्यवधी ग्राहकांना अलर्ट राहण्याचं आवाहन केलं आहे.


एसबीआयच्या नावाने ग्राहकांना बनावट ई-मेल/संदेश पाठवले जात असल्याचं बँकेने म्हटलं आहे. याबाबत ग्राहकांनी सतर्क रहावं असं बँकेने ट्विटरद्वारे म्हटलं आहे. ट्विटमध्ये एसबीआयने ग्राहकांना सोशल मीडियाचा वापर करताना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही दिशाभूल आणि बनावट मेसेजद्वारे तुमची फसवणूक केली जाऊ शकते. यामुळे ग्राहकांनी कुठल्याही मेसेजवर आपली खासगी माहिती शेअर करु नये, संबंधित अकाउंटची पडताळणी करावी असे म्हटले आहे. सूचनेकडे दुर्लक्ष केल्यास फटका बसू शकतो असा इशाराही एसबीआयने आपल्या खातेधारकांना दिला आहे.

याशिवाय, एसबीआयने एक २० सेकंदाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ग्राहकांनी त्यांची गोपनीय माहिती ऑनलाइन सामायिक करु नये, असे स्पष्ट केले आहे. सतर्क राहा, सुरक्षित राहा, सोशल मीडियावर आमच्याशी संपर्क साधताना अकाउंटची पडताळणी करा आणि गोपनीय माहिती ऑनलाइ शेअर करु नका असं एसबीआयने म्हटलं आहे. कोणत्याही प्रकारच्या बँकिंग सेवांसाठी अधिकृत पोर्टलचाच वापर करावं असं आवाहनही एसबीआयने केलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post