आंबट-गोड चिंच खाण्याचे ‘हे’ गुणकारी फायदे जाणून घ्या


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

चवील आंबट-गोड असणारी चिंच साऱ्यांनाच आवडते. एखादा रोजच्या जेवणातील पदार्थ असतो किंवा फास्टफूड अनेक पदार्थांमध्ये चिंचेचा वापर केला जातो. परंतु, चिंच केवळ पदार्थाची चव वाढविण्यापूरतीच मर्यादित नसून तिचे अन्यही काही गुणधर्म आहेत. विशेष म्हणजे चिंच खाल्ल्यामुळे वजन नियंत्रणात येते असं म्हटलं जातं. त्यामुळे चला जाणून घेऊयात चिंचेमध्ये असणारी काही गुणकारी घटकांविषयी.

१. हायड्रॉक्सायक्ट्रिक अॅसिड
चिंचेमध्ये हायड्रॉक्सायक्ट्रिक अॅसिड असते. या घटकामुळे शरिरातील फॅटस वाढण्याचे प्रमाण नकळत कमी होते. तसेच शरीरातील फॅटस वाढविणाऱ्या एन्झामाईनचे प्रमाणही चिंचेमुळे कमी होते.

२. पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत
अनेक जण पचनक्रिया सुरळीत नसल्याची तक्रार करतात. अशा व्यक्तींनी आहारात चिंचेचा वापर करावा. चिंच खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते.

३. बद्धकोष्ठता दूर होते
चिंचेच्या रसामध्ये बद्धकोष्ठता दूर करण्याची क्षमता असते. त्यामुळे बद्धकोष्ठतेसारख्या विविध तक्रारींवर चिंचेचा रस औषध म्हणून वापरला जातो.

४. घसादुखी बरी होते
चिंच ही आंबट असल्याने त्यामध्ये व्हीटॅमिन सी असते. घशात होणाऱ्या वेदना कमी करण्यास चिंचेचा उपयोग होतो.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post