हिवाळ्यात 'या' पदार्थांचे सेवन आरोग्यासाठी लाभदायक


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

थंडीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. ऋतू बदलला, की त्याचे परिणाम आपल्या शरीरावर होतात. हिवाळा हा आरोग्यासाठी पूरक ऋतू मानला जातो. या ऋतूमध्ये शरीराची पचनशक्ती चांगली असते; त्यामुळे आहाराची अधिक काळजी घ्यायला लागते. काय खावं आणि काय खावू नये याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. या दिवसांत थंडीचा सामना करताना शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी, शरीराला जास्त ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जा पुरवताना योग्य व पौष्टिक पदार्थ खाल्ले, तर रोगप्रतिकारक शक्ती वाढायलादेखील मदत होते.

हे पदार्थ खाल्ल्याने हिवाळ्यात देखील ताजेतवाने राहू :

१] ग्रीन टी आणि ब्लॅक टी - ग्रीन आणि ब्लॅक टी दोन्ही आपल्या रोग प्रतिकारक शक्तीला बळकट करण्यासाठी एक किंवा दोनच कप पिणे फायदेशीर असते. याच्या अधिक सेवनाने आपली भूक कमी होऊन वजन देखील नियंत्रणात राहील.

२] कच्चं लसूण - जर आपणास सांधे दुखण्याचा त्रास आहे, तर आपल्या आहारात कच्चं लसूण समाविष्ट केल्याने आपली प्रतिकारक शक्ती वाढते. यामध्ये अ‍ॅलिसिन, झिंक, सल्फर, सेलेनियम आणि व्हिटॅमिन ए आणि इ मुबलक प्रमाणात आढळतात.

३] दूध-दही-ताक - हे रोजच्या खाण्यात असावेत, असे पदार्थ हिवाळ्यातही खाण्यास उत्तम असतात. हिवाळ्यात ऊब मिळावी म्हणून दुधात सुंठ, केशर वगैरे घालता येते. आपल्याला जळजळ होत असल्यास तर आपण दह्याचे सेवन करू शकता. दह्याच्या सेवनाने प्रतिकारक क्षमता वाढते. तसेच हे पाचक प्रणालीला चांगले ठेवण्यास उपयुक्त आहे.

४] ओट्स - हे खाल्ल्याने आपले वजनच कमी होणार नाही तर या मध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. दररोज ओट्सचे सेवन केल्याने आपली प्रतिकारक शक्ती बळकट होते.

५] व्हिटॅमिन सी - लिंबू आणि आवळ्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळतं, तसेच पालक, संत्री, मोसंबी, चवळी, कोबी, कोथिंबीर मध्येही व्हिटॅमिन सी आढळतं. जे रोग प्रतिकारक क्षमतेला चांगले ठेवण्यासाठी मदत करतात.

६] अंजीर - अंजीर पोटॅशियम, मॅगनीज आणि अँटी ऑक्सीडेन्ट घटकाने समृद्ध असतात. हे शरीराच्या पीएच पातळीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. यामध्ये असलेले फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते.

७] जवस - अळशी मध्ये ओमेगा-3 आणि फॅटी अ‍ॅसिड आढळते. शाकाहारी असणाऱ्यांना ओमेगा -3 आणि फॅटी अ‍ॅसिड हे चांगले स्रोत आहे.

८] मशरूम - मशरूम खाल्ल्याने आपली रोग प्रतिकारक शक्तीच बळकट होत नाही तर हे पांढऱ्या रक्त पेशींचे कार्य वाढवून शरीराच्या प्रतिकारक शक्तीला वाढवतं. कर्क रोगापासून संरक्षणासाठी देखील मशरूमचा वापर केला जातो.

९] गाजर - गाजराचे काम शरीरात रक्त वाढविण्यासाठी, गाजराच्या सेवनाने फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता कमी असते. डोळ्याच्या आजारांना टाळण्यासाठी नियमितपणे गाजराचे सेवन करावे.

१०] टॉमेटो - टॉमेटोमध्ये लायकोपिन असतं, जे शरीरातील मुक्त असलेल्या रॅडिकल्स ला न्यूट्रलाइझ करतं, यामुळे फ्री किंवा मुक्त असलेले रॅडिकल्स आपल्या शरीरास काही हानी पोहोचवू शकत नाही. रक्तवाढीसही उपयोगी आहे.

११] डिंकाचे व सुकामेव्याचे लाडू - आपल्याकडे थंडीच्या दिवसात डिंकाचे व सुकामेव्याचे लाडू करायची पद्धत आहे. हे लाडू पौष्टिक असतात. प्रथिने, कॅल्शिअम व लोह हे सारे काही या लाडवांत भरपूर प्रमाणात असते.

१२] हिरव्या भाज्या - या दिवसात भाज्यांचे सूप घेतल्यास भरपूर पोषकतत्त्वे मिळू शकतील. या दिवसांत भाज्या खूप चांगल्या प्रतीच्या व भरपूर प्रमाणात मिळतात. पालेभाज्यांचा तर हा सर्वोत्तम काळ आहे. त्यांचा वापर भरपूर करावा. हिरव्या भाज्यांमधील 'अ' आणि 'क' ही जीवनसत्त्वे थंडीत खाणेही चांगले आहे.

१३] बदाम-काजू-पिस्ता - उत्तम प्रकारचे स्निग्ध पदार्थ यातून मिळतात.

१४] जिरे, लसूण, मोहरी, सूंठ, हळद, आले, हिंग, मिरची, पुदिना, ओवा, मिरी, लवंग, तमालपत्र, दालचिनी, जायफळ, तीळ वगैरे मसाल्यांमध्ये स्वत:चा वेगळा गुणधर्म असतो. या मसाल्यांचा खाद्यपदार्थ बनवताना योग्य वापर केल्यास शरीराला या मसाल्यातील औषधी गुणधर्म मिळू शकतात.

हिवाळ्यात प्यायचे पाणी गरम वा कोमट असणे उत्तम होय. जेवताना गरम पाणी पिण्याने अन्नपचन व्यवस्थित होण्यास मदत मिळते. तसेच एरवीसुद्धा गरम पाणी पिण्याने ऊब मिळण्यास मदत मिळते. आपण पौष्टिक पदार्थ खातो आणि आपली पचनशक्तीही योग्य असते, तरीसुद्धा #व्यायाम नसेल तर शरीराला या पोषकतत्त्वांचा योग्य वापर करता येणार नाही. त्यामुळे सर्वांनीच आपल्या हिवाळ्यातील आहाराचे नियोजन भरपूर पोषकतत्त्वयुक्त पदार्थांनी करा व नियमित व्यायामदेखील करा.

(कोरा या संकेतस्थळावर आकाश कोल्हे यांनी ही माहिती दिली आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post