रस प्या, फोडी खा किंवा लोणची बनवून चाखा! आवळ्याचं सेवन असं ठरतं लाभदायक

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

नोव्हेंबर-डिसेंबर महिना म्हणजे हिवाळ्याची सुरुवात झाली की बाजारात एका फळाची आवक वाढत जाते. ते फळ म्हणजे आवळा. चवीला तुरट असलेला आवळा हा अत्यंत गुणकारी मानला जातो. आवळ्याचा रस, फोडी, मोरावळा, लोणची अशा विविध प्रकारे या फळाचे सेवन केले जाते. थंडीत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी च्यवनप्राश सेवन केले जाते. यातील मुख्य घटक हा आवळाच असतो. पाहुयात आवळ्याचे फायदे.

आवळा हा शारीरिक स्वास्थ्यासाठी अत्यंत गुणकारी मानला जातो. आवळ्याचे अनेक फायदे आहेत. आवळ्यातून मिनरल म्हणजे खनिजं आणि विटामिन जीवनसत्त्वे मिळतात. या पोषक तत्त्वांनी अनेक व्याधींपासून आपला बचाव होतो. आवळ्याचा डाएटमध्ये वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करता येतो. त्याचे ज्यूस, मोरावळ, लोणचं किंवा कच्च्या फोडी अशा विविध प्रकारे सेवन करता येते, ज्यामुळे शरीराला अत्यंत आवश्यक अशी तत्त्वे देखील मिळतात. आयुर्वेदात आवळा अत्यंत गुणकारी मानण्यात आला आहे (Amla in ayurved).

आवळ्यातून विटामिन-सी मिळते, ज्यामुळे इम्यूनिटी म्हणजे रोगप्रतिकारकशक्ती आणि मेटाबॉलिजम म्हणजे पाचनशक्ती चांगली होते. आवळ सर्दी, कफ यासह शरीरात व्हायरल आणि बॅक्टीरिअल इंफेक्शन होऊ देत नाही. आवळ्यात अशी देखील तत्त्व असतात जी कॅन्सरच्या पेशींना देखील नष्ट करतात. आवळ्याचा ज्यूस शरीराच्या सर्व प्रक्रिया संतुलित करतात आणि त्रिदोष म्हणजेच वात, कफ, पित्त यावर उपायकारक ठरतात.

अस्थमा सारख्या आजारात आवळा गुणकारी
श्वसनासंबंधित आजार जसे अस्थमावर नियंत्रण मिळवणे या सोबतच डायबिटीज म्हणजे मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. आवळ्यामुळे पचनसंस्था देखील चांगली होते. यामधील व्हिटामिन-सी इम्यूनिटी आणि रेस्पिरेटरी ट्रॅक्ट साठी महत्त्वाचा मानला जातो.

कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण
नियमित रूपाने आवळ्याचा ज्यूस पिण्यामुळे कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी होतो आणि शरीर स्वस्थ राहते. यामधील अमिनो अॅसिड और अॅन्टीऑक्सीडेंटमुळे हृदयाचे कार्यही व्यवस्थित सुरू राहते.

लिव्हर म्हणजेच यकृतासाठी गुणकारी
आवळ्यात यकृताला सुरक्षित ठेवणारी आवश्यक तत्त्व आढळतात. शरिरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी त्याचा अत्यंत उपयोग होतो.

तोंड येणे, फोडं होणे यावर फायदेशीर
आरोग्यतज्ज्ञ म्हणतात की आवळ्याचा रस हा खोकला आणि फ्लू सोबतच तोंड येणे, तोंडाट फोडं होणे यावर देखील उपायकार ठरतात. आवळ्याचा उपयोग प्रतिबंधात्मक म्हणून केला जातो. दोन चमचे आवळा रसात दोन चमचे मध मिसळून दररोज सेवन केल्यास सर्दी आणि खोकल्यापासून बराच आराम मिळतो. सतत तोंड येत असेल तर आवळा रस पाण्यात एकत्र करून त्याने गुणळ्या केल्यास देखील बराच फरक पडतो.

केसांची मूळं मजबूत करतो
केसांसाठी देखील आवळा एखाद्या औषधाप्रमाणेच काम करतो. केसांच्या रचनेत 99 टक्के प्रोटीनचे योगदान असते. आवळ्यातील अमीनो अॅसिड आणि प्रोटीन केसांच्या वाढीस मदत करते, तसेच केस गळण्यापासून थांबवते आणि मुळापासून केसांना मजबूत बनवते.

त्वचेवरील डागांपासून मुक्ती
आवळा रस स्किन ट्रीटमेंटमध्ये देखील अत्यंत उपयोगी आहे. आवळ्याच्या रसात कापूस भिजवून चेहऱ्यावर त्याचे लेपन केल्यास त्वचेवरील डाग कमी होतात आणि चमक येते.

न्यूट्रिशन ड्रिंक
व्हिटामिन-सी सोबतच आवळ्यात लोह, कॅल्शियम आणि फॉस्फोरस बऱ्याच प्रमाणात आहेत आणि त्यामुळे न्यूट्रिशन ड्रिंक देखील त्याचे सेवन करता येते.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post