ट्विटरमध्ये आलं ‘इंस्टाग्राम’सारखं नवीन फिचर

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरने Fleets हे बहुप्रतिक्षित फिचर जगभरात रोलआउट करण्यास सुरूवात केली आहे. हे फीचर Snapchat आणि Instagram च्या ‘स्टोरी’ फीचरप्रमाणे आहे. Twitter Fleets वर केलेले ट्विट 24 तासांनंतर आपोआप गायब होतात. Fleets वर टेक्स्ट, फोटो किंवा व्हिडिओ ट्विट करता येतील.


ट्विटरने बऱ्याच दिवसांआधी Fleets फीचरची घोषणा केली होती. जगभरात लाँच करण्याआधी या फीचरची जून महिन्यापासून भारतासह, ब्राझील, इटली आणि दक्षिण कोरियामध्ये टेस्टिंग सुरू होती. Fleets या फिचरअंतर्गत 24 तासांनंतर पोस्ट दिसेनासे होतात आणि कोणतेही लाइक्‍स, रिट्विट्स किंवा पब्लिक प्रतिक्रिया दिसत नाहीत. केलेले ट्विट्स हे सार्वजनिक असण्‍यासोबत कायमस्‍वरूपी राहतात आणि रिट्विट्स व लाइक्‍स दिसत राहतात. त्यामुळे फ्लीट्स या फिचरअंतर्गत अधिकाधिक लोकांना ट्विटर मुक्तपणे अभिव्‍यक्‍त होण्यास वापरता येईल, असा यामागे विचार आहे.

हे फिचर कसे वापराल?
नवीन फ्लीट तयार करण्‍यासाठी तुमच्‍या प्रोफाइलच्‍या वरील डाव्‍या बाजूस असलेल्‍या आयकॉनवर क्लिक करा.
फोटो किंवा व्हिडिओ करण्‍यासाठी टायपिंग सुरू करा किंवा मीडिया आयकॉनवर क्लिक करा. पोस्‍ट करण्‍यासाठी ‘फ्लीट’वर क्लिक करा.

एखाद्या व्‍यक्‍तीचे फ्लीट कसे पाहाल?
व्‍यक्‍तींचे नवीन फ्लीट्स पाहण्‍यासाठी आयकॉनवर क्लिक करा.
नवीन फ्लीट्स, तसेच जुने फ्लीट्स पाहण्‍यासाठी खाली स्‍वाइप करा.
तुम्‍ही फॉलो करत असलेल्‍या इतर अकाऊंट्समधील फ्लीट्स पाहण्यासाठी डावीकडे किंवा उजवीकडे स्‍वाइप करा.

फ्लीट्सवरील तुमच्‍या फॉलोअर्सना प्रतिक्रिया देण्यासाठी-
डायरेक्‍ट मॅसेजेस् (डीएम) सुरू केल्‍यानंतर प्रतिक्रिया व प्रतिसाद देण्‍यासाठी बटन्‍स उपलब्‍ध आहेत.
फॉलोअर्स डीएमच्‍या माध्‍यमातून खासगीरित्या प्रतिक्रिया देऊ शकतात किंवा इमोजीसह जलदपणे प्रतिसाद देऊ शकतात आणि डीएममध्‍ये खासगीरित्‍या संवाद सुरू ठेवू शकतात.

Post a Comment

Previous Post Next Post