प्रवेशासाठी भाजपकडून मंत्री पदासह 'एवढ्या' कोटींची ऑफर; काँग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

मध्य प्रदेशात विधानसभेच्या २८ जागांवर पोट निवडणुका होत आहेत. याचा निवडणुक प्रचार शिगेला पोहचला असून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या जात आहेत. यातच आता काँग्रेसच्या नेत्यानं भाजपावर मोठे आरोप केले आहेत. कमलनाथ सरकारमध्ये मंत्री राहलेले आमदार उमंग सिंघार यांनी भाजपा खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपात प्रवेश करण्यासाठी मंत्रीपदाची आणि ५० कोटी रुपयांची ऑफर दिली होती, असा गौप्य स्फोट सिंघार यांनी केला आहे.

सिंघार यांच्या या आरोपानंतर मध्य प्रदेशच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. काँग्रेसनं ज्योतिरादित्य शिंदे यांना लक्ष करत टीका केली आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी सिंघार यांच्या आरोपांना उत्तर द्यावं, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह म्हणाले.

उमंग सिंघार हे ज्योतिरादित्य शिंदे यांचे खास होते. यामुळे ज्योतिरादित्य शिंदे यांनी या आरोपांवर स्पष्टीकरण द्यावं. ज्योतिरादित्य शिंदे यांनी उमग सिंघार सत्य बोलतं आहेत की खोटं हे स्पष्ट करायला हवं, असं बदनावरमधील सभेत दिग्विजय सिंह म्हणाले आहेत. दिग्विजय सिंह यांनी ट्विट कर शिंदे यांना याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी असं म्हटलेय.

Post a Comment

Previous Post Next Post