सर्दी-खोकला झाल्यास या पद्धतीनं करा कांद्याचा उपयोग

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

पावसाळ्यात सर्दी-खोकला आणि ताप या साधारण समस्या आहेत. अनेकदा या समस्या वातावरणातील बदलांमुळे होतात. सर्दी आणि खोकला सामान्य असला तरिही अनेक दिवस यांचा त्रास सहन करावा लागतो. एवढचं नाहीतर यामुळे थकवाही जाणवतो. खरं तर पावसाळ्यात अनेक बॅक्टेरिया थैमान घालत असतात. अशातच सर्दी-खोकला झाल्यानंतर आपण डॉक्टरांच्या औषधांसोबतच अनेक घरगुती उपायही करतो. स्वयंपाक घरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या सर्दी, खोकला अन् तापासाह इतर आजारावरही रामबाण आहेत. आज आपण कांद्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. सर्दी आणि खोकल्यावर घरगुती औषध करण्यासाठी कांद्याचा कसा वापर करावा…

कांदा हा तिखट अग्निदीपक, रुचकर कफोत्सारक, उत्तेजक, मूत्रल, कामोद्दीपक असा बहुगुणी आहे. कांद्यात कॅल्शिअम, अ‍ॅल्युमिन, लिग्नीन आणि अ, ब, क जीवनसत्त्व, गंधक, फॉस्फोरिक आम्ल, तंतुमय पदार्थ, स्निग्धता असे अनेक औषधी गुणधर्म आहेत. पाहूयात कांद्याचा वापर करण्याच्या चार पद्धती….

१. कांद्याचा सिरप (Onion Syrup)
सिरप तयार करण्यासाठी कांद्याचा तुकडा एका वाटीत टाका. त्यामध्ये मध मिसळा. दहा ते १५ तास भिजू द्या. तुमचं सिरप तयार आहे.

२. कांद्याची वाफ (Onion Steam)
कांद्याची वाफ घेतल्यानंतर तुमचा रेस्पिरेटरी सिस्टम चालू होतं आणि कफ पातळ होण्यास मदत होते. यासाठी तुम्हाला गरम पाण्यात कांद्याचे तुकडे टाकावे लागतील. हे पाणी चांगलं उकळू द्यावं. वाफ निघण्यास सुरु झाल्यानंतर दोन ते तीन मिनिटं वाफ घ्या.

3. कांद्याचा रस (Onion Juice)
सर्दी खोकल्यापासून सुटका पाहिजे असल्यास कांद्याचा रसही पिऊ शकता. जर तुम्ही कांद्याचा रस पिऊ शकत नसाल तर यामध्ये लिंबू आणि मध मिसळा. या रसाला चव येईल.

४. कांद्याचं सूप (Onion Soup)
कांद्याचे तुकडे घ्या. त्यामध्ये काळी मिर्ची टाका. चविनुसार मिठ मिसळा. हे मिश्रण पाण्यात टाकून उकळा. त्यानंतर थंड झाल्यानंतर याचं सेवन करा…. .

५. जेवणात जेवढा करता येईल तेवढा कांद्याचा वापर करा. यासोबतच कच्च्या कांद्याचा रस आणि त्यामध्ये मध टाकून प्या. कोरडा असो किंवा कफचा प्रत्येक प्रकारचा खोकला दूर होतो.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post