वासनवेल कोरोना उपचारात फायदेशीर कशी?


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

वासनवेल ही वनस्पती आयुर्वेदात अनेक औषधांमध्ये वापरली जाते. यालाच पातालगरुडी, पाठा, जलजमनीं असेही म्हणतात. याच्या पानांचा व मुळाचा औषधामध्ये वापर केला जातो. ही वनस्पती गुणाने उष्ण, कडू, तिखट चवीची, स्निग्ध, पचण्यास हलकी आहे. तसेच सर्व प्रकारचे ताप कमी करणारी आहे.

यामध्ये flavonoids, saponins, steroids, terpenoids हे phytochemicals असतात, म्हणजेच ही नैसर्गिकरित्या त्यामध्ये असलेली chemicals.

अँटी बॅक्टरियल, अँटी oxidants, अँटी inflammatory, अँटी neoplastic म्हणुन याचा उपयोग होतो. Antiviral आहे, म्हणजेच व्हायरल इन्फेक्शन मध्ये व्हायरल लोड कमी करण्यास उपयोगी पडते.

श्वास वहन संस्थानाचे विकार उदा. खोकला, दमा, सर्दी यामध्ये उपयोगी आहे. श्र्वास घेण्यास त्रास होत असेल तर याचा उपयोग होतो. यामुळे वासनवेल कोरोना उपचारात उपयोगी पडू शकते.

(कोरा या संकेतस्थळावर शुभांगी क्षीरसागर यांनी ही माहिती दिली आहे. कोणतेही उपचार करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post