अशी बनवा भाजी.. हे आहेत आरोग्यदायी फायदे

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

शरीर स्वास्थ्यासाठी भाज्या आणि फळे खा हे प्रत्येक जण सांगत असतो. मात्र त्या भाज्या कशा खा हे कोणीच सांगत नाही. काही भाज्या या शिजवण्यापेक्षा कच्च्या खाल्याने जास्त पोषण मिळते. तर काही भाज्या उकडण्यापेक्षा वाफवून घेतल्याने त्याचे अधिक फायदे मिळतात. भाज्याचे पुर्ण पोषणमुल्य हवं असेल तर भाजी कशी खावी यासाठी या टीप्स..


ब्रोकोली वाफेवर शिजवा
ब्रोकोली खाण्याचे खूप फायदे आहेत. ब्रोकोलीच्या भाजीचा डाएट प्लानमध्ये नेहमीच समावेश असतो. ही भाजी करताना ब्रोकोली फ्राई़़ड किंवा उकळवून घेतली तर त्यातील जीवनसत्त्व नष्ट होतात. यामध्ये असलेले ग्लुकोसायनोलेट मुळे शरीरात वॅâन्सरच्या पेशींची वाढ रोखण्यास मदत होते. ही भाजी वापेâवर शिजवल्याने जास्त फायदेशीर ठरते.

कच्चा लसूण उपयोगी

कच्च्या लसूणमध्ये सेलेनिअम अ‍ॅण्टीऑक्सीडन्ट तत्व असतात. यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रीत राहते. कच्च्या लसणाच्या सेवनाने गंभीर आजारांना दूर ठेवता येते. लसणीच्या पोषणमुल्याचा अधिकाधिक उपयोग करून घ्यायचा असेल तर तो कच्चाच खाल्लेला चांगला.

मशरूम कुकरमध्ये शिजवा
सर्वात कमी वॅâलरीज असलेले मशरूम तितकेच टेस्टी आहे. यामध्ये फायबर आणि अ‍ॅण्टी ऑक्सिडंटची मात्रा भरपूर आहे. मशरूम सलाडमध्ये कच्च्या स्वरूपातही खाल्ले जाते. मात्र मशरूम प्रेशर कुकरमध्ये शिजवून खाल्ले तर त्याचे पोषणतत्व अधिक वाढते. मशरूम्स लवकर शिजवल्यास त्यातील अ‍ॅण्टी ऑक्सिडंट्स वाढतात. डाएट करणाऱ्यांसाठी याचे सेवन विशेष फायदेशीर ठरते.

टोमॅटोची प्युरी फायदेशीर
भाज्या, उसळ, सलाड सगळ्यामध्ये वापरले जाणारे टोमॅटो शरीरस्वास्थ्यासाठी तितकेच गुणकारी आहे. बाजारात रेडीमेड मिळणाNया टोमॅटोच्या सॉस पेक्षा ताज्या टोमॅटोची प्युरी ही जास्त फायदेशीर आहे. जेवण तयार करताना याचा अधिक वापर केल्यास खुप फायदे मिळू शकतात. यामध्ये असलेले लाइकोपीन नावाचे घटक हृदयरोग आणि वॅâन्सर सारखे गंभीर आजारांना दूर ठेवतात.

गाजर शिजवा!
सॅलडमध्ये महत्त्वाचा घटक असणारा गाजर हा कच्चा खाण्यापेक्षा शिजवून खाल्ला तर अधिक फायदेशीर ठरेल. गाजरामध्ये वॅâरेटीनॉइड नावाचे तत्व असते. गाजराच्या सेवनामुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते. तर लायकोपीन सारखे वॅâरेटीनॉइड शिजल्यानंतर त्याची पोषणमुल्ये वाढतात. यासाठी गाजर फार शिजवून घ्येण्याची गरज नाही. वापेâवर ठेवून विंâवा नुसते परतून खाल्ल्यानेही याचा फायदा होतो.

रताळे बेक्ड करा!
रताळ्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन, वॅâल्शीअम, मॅग्नेशिअमची भरभरून मात्रा आहे. रताळे हे नेहमी उकडून खाल्ले जातात. रताळ्याच्या नियमीत सेवनामुळे शरीरातील हाडे मजबूत होतात. यामुळे ही पोषणमुल्ये घटण्याची जास्त शक्यता असते. यापेक्षा रताळे सालीसकट बेक्ड करून खाल्यास फायदेशीर ठरते.

ताजा फलाहार केव्हाही फायद्याचाच!
ताज्या फळांमध्ये असलेले फायबरचे प्रमाण पाहता दिवसातून एक तरी फळ खाण्याचा प्रयत्न करा. व्हिटॅमिन्सने परिपूर्ण असल्याने फळांच्या सेवनातून शरीरात कमी कॅलरीज जातात. यामध्ये ब्लुबेरी, द्राक्ष ही फळे टाइप २ डायबिटीजची शक्यता घटवतात. फळांचा रस पिण्यापेक्षा फळे खाल्याने जास्त पोषण मिळते.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post