वजन वाढतेय? नाश्ता व जेवणाची वेळ पाळल्यास 'हे' होतील फायदे


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

आपण सेवन करत असलेल्या आहारावरच आपले वजन अवलंबून असते. वजन वाढू नये म्हणून सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण आणि राञीच्या जेवणाची वेळ सुद्धा महत्वाची आहे.

नाष्टा : सकाळचा नाष्टा हा सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान करावा. कारण राञीचे जेवण आपण लवकर घेतलेले असते. त्यामुळे सकाळी लवकर भुक लागलेली असते. वजन कमी करायचे असेल तर नाष्ट्यामध्ये प्रोटीनयुक्त आहार घ्यायला हवा. त्यामुळे उकडलेल्या अंड्याचा पांढरा भाग, पनीर, सोयाबीन, शेंगदाणे, बाँईल चिकन घेऊ शकता. कार्ब आणि फॅटी पदार्थ घेतल्याने चरबी वाढते आणि आपले वजन देखील वाढते.

दुपारचे जेवण : दुपारच्या जेवणाची वेळ साधारण १ ते ३ असावी. दुपारच्या जेवणामध्ये ताक, दही किंवा दुध असावे. अशाप्रकारचे पातळ पेये घेतल्याने जेवण कमी जाते आणि लवकर पोट भरते. त्याचबरोबर दुपारच्या जेवणामध्ये सलाडचे प्रमाण जास्त असावे. सलाडमध्ये कांदा, काकडी, टोमँटो, कोबी, बीट, मुळा, गाजर, ढब्बु मिरची यांचे छोटे छोटे तुकडे करुन त्यावर थोडे चाट मसाला टाकावा. सलाडमध्ये फॅट कमी असते. वजन कमी करायचे असेल भात कमी प्रमाणात खावे. भातामध्ये मोठ्या प्रमाणात कार्ब असतात. सकाळी आणि दुपारी अनेकांना चहा घेण्याची सवय असते. पण वजन कमी करायचे असल्यास चहा वर्ज करावा. चहाऐवजी ग्रीन टी घ्यावी. ग्रीन टी दुपारी ४ नंतर घ्यावी. ग्रीन टी वजन कमी करण्यास मदत करते.

राञीचे जेवण : राञीच्या जेवणाची वेळ ७.३० ते ८.३० वाजता. राञी जेवण लवकरच घ्यावे. उशिरा जेवण केल्याने वजन वाढु शकते. कारण राञी जेवण करुन आपण लगेच झोपते. राञी शरीराची हालचाल मंद झालेली असते. आपण वेळाने जेवन केल्यानंतर त्यातुन मिळालेली ऊर्जा खर्च होत नाही. त्यामुळे ऊर्जेचे रुपांतर चरबीमध्ये होते आणि आपले वजन वाढते. राञीचे जेवण हलके फुलके असावे. आपल्या भुकेपेक्षा दोन घास कमी जेवावे. एक ग्लास कमी फॅटचे दुध घ्यावे. भात खाऊ नये. राञीच्या जेवणात देखील सलाड घेतले तरी चालेल. राञी कमी जेवल्याने अपचन होत नाही. पहाटे लवकर जाग येते आणि पोट देखील साफ होते. पहाटेच्या व्यायामासाठी पोट साफ असणे खुप महत्वाचे असते. दिवसभराच्या दिलेल्या जेवणाच्या वेळा पाळल्याने वजनवाढ रोखण्यास मदत होईल.

(कोरा या संकेतस्थळावर अशोक जमादार यांनी ही माहिती दिली आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post