पचनक्रिया व्यवस्थित राहण्यासाठी काय करावे?


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

पचन संस्था ही आपल्या शरीरातील महत्वाचा एक भाग असतो. साधारणत: ९० % आजार होण्याचे कारण आपल पोट असते. खाण्या पिण्याच्या बाबतीत ज्या चुका चूका होतात त्याचे परिणाम उतार वयात १०० % भोगावे लागतात. आजच्या धावपळीच्या युगात बैठे काम, चहा - कॉफीचे सेवन, वेगवेगळी व्यसने, राञ-राञ चालनार्या पार्ट्या, फास्ट फूड अशी भरपूर करणे आहेत. त्यामुळे वेगवेगळे आजार होतात. चेहऱ्यावर डाग पडतात. अशी इतर भरपूर कारण आहेत.

काय करू नये..

१. सुर्योद्यानंतर उठणे

२. व्यायाम न करणे व दिवसा झोप घेणे

३. उपाशी पोटी चहा पिणे

४. अवेळी जेवण, भुकेपेक्षा जास्त खाणे. पुर्वीचा आहार पचण्यापूर्वी जेवणे, (पोटात अन्न पचणे आणि सडणे यात फरक आहे) भुक लागण्याच्या आधीच खाणे

५. राञी उशिरा झोपणे (११ नंतर)

६. बेकरी पदार्थाचा अतीवापर करणे.

७. शिळे, आंबवलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाणे

८. रासायनिक पदार्थाचा आहारात वाढलेला समावेश

९. चिंता, द्वेष, क्रोध अशा मानसिक कारणांमुळे पचनसंस्थेचे कार्य बिघडते

काय करावे..

१. सकाळी लवकर उठावे (५-५:३०)

२. व्यायाम व योगा करावा

३. च्यवणप्राश खावे

४. कधीही अंघोळ केल्यावरच जेवन करावे.

५. जेवणाआधी ३० मिनिटे व जेवणानंतर ३० मिनिटांनी पाणी प्यावे

६. आहार हा गरम, स्निग्ध व सकस आहार घ्यावा. अन्न बारीक चावून व सावकाश खावे.

७. भुकेपेक्षा कमी खावे. नेहमी कोमट पाणी प्यावे.

८. लवकर झोपावे व डाव्या कुशी वरती झोपावे.

काही घरगुती उपाय..

१. लसणाच्या पाकळ्या चावून खाव्यात

२. जेवनात केळी, पपई, मुळा असावा

३. सकाळी पोट खाली असताना १ वाटी दही + चवीनुसार सेंद्रिय गूळ एकञीत करून खावा.

(कोरा या संकेतस्थळावर सिध्दार्थ माने यांनी ही माहिती दिली आहे. कोणतेही उपचार वैद्यकीय सल्ला घेऊनच करावेत.)

Post a Comment

Previous Post Next Post