Whatsapp वर खूप व्हिडिओ पाठवतात? तुमच्यासाठी येतंय खास फिचर

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp ने गेल्या आठवड्यात तीन नवीन फिचर्स लाँच केले आहेत. आता WhatsApp अजून दोन नवीन फिचर आणण्याच्या तयारीत आहे. हे दोन्ही फिचर Mute Video आणि Read Later नावाने येतील. यातील म्यूट व्हिडिओ हे फीचर अगदी नवीन आहे, तर Read Later हे फीचर ‘Archived Chats’ चं नवीन व्हर्जन आहे. हे दोन्ही फिचर WhatsApp च्या पुढील अपडेटमध्ये येण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया या दोन्ही फीचर्सबाबत :-

काय आहे Mute Video?
WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅप सध्या म्यूट व्हिडिओ या फिचरवर काम करत आहे. या फिचरद्वारे युजर एखाद्याला व्हिडिओ पाठवण्याआधी तो म्यूट करु शकतील. म्हणजे जर तुम्ही म्यूट व्हिडिओ पर्यायावर टॅप करुन सेंड केल्यास तो व्हिडिओ समोरील व्यक्तीला विना आवाजाचाच सेंड होईल. हे फिचर स्टेटस सेट करतानाही उपयोगी पडेल. म्यूट व्हिडिओ फिचर सध्या बीटा व्हर्जनमध्ये देण्यात आलं आहे. WABetaInfo ने या फिचरशी संबंधित एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्यात व्हिडिओ लेंथच्या खाली व्हॉल्यूम आयकॉन दिसत आहे. त्यावर टॅप करुन व्हिडिओ व्हॉल्यूम कमी-जास्त किंवा म्यूट करता येईल. अशाचप्रकारे स्टेटसवर एखादा व्हिडिओ सेट करताना तो व्हिडिओही म्यूट करता येईल.

कसं काम करतं Read Later Feature?
व्हॉट्सअ‍ॅप ‘Read Later’ हे फिचर ‘Archived Chats’ चं नवीन व्हर्जन आहे. या फिचरद्वारे युजर्स निवडक चॅट्सला पाहिजे तेवढ्या वेळ म्यूट करु शकतात. ज्या व्यक्तीचे मेसेज वाचायचे नाहीत, किंवा ज्याच्याशी चॅटिंग करायची इच्छा नसेल, त्याचा कॉन्टॅक्ट Read Later पर्यायात ऐड करावा लागेल. त्यानंतर संबंधित कॉन्टॅक्टकडून मेसेज किंवा कॉल केल्यासही तुम्हाला कोणतेच नोटिफिकेशन मिळणार नाही. Archived Chat आणि Read Later फिचरमध्ये सर्वात मोठा फरक म्हणजे Read Later मध्ये कॉन्टॅक्ट सिलेक्ट केल्यानंतर नवीन मेसेज आल्यास नोटिफिकेशन मिळणार नाही. तर, Archived Chat मध्ये नवीन मेसेज येताच नोटिफिकेशन मिळतं. Read Later ऑप्शनला युजर्स आपल्या इच्छेनुसार कधीही एनेबल किंवा डिसेबल करु शकतात.

Post a Comment

Previous Post Next Post