वाईन जितकी जुनी तेवढी चांगली, असे का?एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

वाईन जितकी जुनी असते तितकी चांगली असते. कारण वाईनचे पीएच जर जास्त अम्लीय असेल त्याची चव, कमी अम्लीय वाईनपेक्षा चांगली लागते आणि वाईनची अम्लीयता वाढवायची असेल तर त्यांना जास्त काळासाठी सूर्यप्रकाशापासून दूर ठराविक तापमानात साठवून ठेवले जाते. या सगळ्यात रासायनिक क्रिया होते आणि त्याच्यामुळे वाईनची चव चांगली होते.

पांढऱ्या आणि लाल वाईनमध्ये टॅनिन हा फेनोलिक्स असतो, जो वाईनला जास्त काळासाठी सुरक्षित ठेवतो. जेव्हा वाईन नवीन असते तेव्हा त्यात असलेल्या टॅनिन्स मुळे त्याची चव कडू आणि वास उग्र असतो. जेवढा मोठा काळ (वर्ष) तुम्ही वाईनला साठवून ठेवाल तितकी त्याची चव चांगली आणि ती सुगंधीत होते.वर दिलेल्या चित्रात तुम्ही जुन्या आणि नवीन वाईन मध्ये फरक सांगू शकता.

महत्वाची गोष्ट म्हणजे, बनवल्या गेलेल्या वाईन मध्ये फक्त १% वाईनला जतन करून ठेवले जाते. उरलेले ९९% वाईन लगेच पिण्यासाठी असते.

पांढरे वाईन बनवताना द्राक्षाची साल वापरली जात नाही. पण लाल वाईनसाठी द्राक्षाची साल वापरून आंबवले जाते.शॅम्पेन ही पांढरी वाईन असते. त्याला शॅम्पेन म्हंटले जाते कारण त्याची निर्मिती फक्त फ्रान्सच्या एपन्रे शहरातील शॅम्पेन भागात केली जाते. विंटेज शॅम्पेन ही जास्तीत जास्त ९ वर्ष जुनी असते.


(कोरा या संकेतस्थळावर आरती तुळजापुरे यांनी ही माहिती दिली आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post