हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी आणि शरीरात उष्णता टिकवण्यासाठी उबदार कपडे घालण्यासोबतच आहाराकडे लक्ष देणेही गरजेचे असते. या काळात शरीरात उष्णता निर्माण करणाऱ्या पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे. आहारात योग्य ते बदल केल्याने शरीराला आवश्यक असलेली उष्णता मिळते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते.

इतर ऋतूत सुकामेव्याचा वापर जपून करावा लागतो. सुकामेव्यामुळे शरीराला उर्जा निर्माण होते आणि आवश्यक ती उष्णताही मिळते. सुकामेवा उष्ण प्रकृतीचा असल्याने इतर ऋतूत त्याचा वापर जपून करावा लागतो. मात्र, हिवाळ्यात सुकामेवा खाणे फायदेशीर असते. हिवाळ्यात बदाम, अंजीर,खजूर यासारख्या सुका मेव्याचा आहारात समावेश करता येतो. खजूर आणि अंजीरमध्ये कॅल्शियम आणि लोह विपुल असल्याने त्यातून शरीराला नैसर्गिक पद्धतीने उष्णता मिळते. तसेच शरीराची उर्जा वाढवण्यासही मदत होते.

तूपामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे हिवाळ्यात त्याचा आहारात समावेश केल्याने फायदा होतो. शुद्ध तुपात अनसॅच्युरेटेड फॅट असतात. ते शरीराला नैसर्गिकरित्या उर्जा देतात आणि निरोगी राहण्यास मदत होते. तसेच हिवाळ्यात येणारी सुस्ती घालवण्यासाठीही तुपाचा उपयोग होतो.

हिवाळ्यात गाजर, मुळे, बटाटे, कांदा आणि लसूण यांचा आहारात समावेश केल्यानेही फायदा होतो. हे पदार्थ उष्ण प्रकृतीचे असल्याने त्यांचा आहारात समावेश करावा. तसेच हे पदार्थ पचायला हलके असून शरीरात उष्णता निर्माण करतात. हिवाळ्यात शरीरात आवश्यक ती उष्णता मिळवण्यासाठी या पदार्थांचा जास्त प्रमाणात वापर करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. हे पदार्थ शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून निरोगी राहण्यास मदत करतात.

हिवाळ्यात गोड पदार्थांमध्ये साखरेएवजी मधाचा वापर करावा. सकाळी लिंबूपाण्यासह मध घेण्याचेही अनेक फायदे आहेत. तसेच सलादवरही मध टाकून घेतल्यास त्याचा स्वाद वाढवता येतो. मध शरीराला फायदेशीर असले तरी मधुमेहाच्या रुग्णांनी त्याचा वापर डॉक्टरांच्या सल्लानेच करावा. मधामध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याने शरीरीतील उष्णता वाढवण्यासह त्याचे अनेक फायदेही होतात.

इतर ऋतूंमध्ये मसाल्याचे सेवन योग्य प्रमाणात करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. मात्र, हिवाळ्यात मसाल्याचे पदार्थ पचवण्याची शरीराची क्षमता वाढते. त्यामुळे हिवाळ्यात मसाल्याचा वापर आहारात करण्याने फायदा होतो. लवंग, दालचिनी, आले, चक्रफूल यासारख्या मसाल्यांनी शरीराला आवश्यक ती उष्णता मिळते. तसेच आराहाचा स्वादही वाढतो. तसेच हे मसाले सूप आणि चहामध्ये टाकूनही घेता येतात. त्यामुळे हिवाळ्यात या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास नैसर्गिकरित्या शरीराला आवश्यक ती उष्णता मिळते. तसेच निरोगी राहण्यासही मदत होते. 

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार किंवा उपाय करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)Post a Comment

Previous Post Next Post