शिक्षक घेणार राष्ट्रकार्यात सहभाग.. विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा असल्याने तो काहीअंशी भरून काढण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेतला आहे. आम्ही शिक्षक रक्तदान करणार अशा बोधवाक्याद्वारे कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या माध्यमातून नगरमध्ये येत्या रविवारी (२० डिसेंबर) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी दिली.

राज्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या नगर शहरातील शिक्षकांच्या पुढाकारातून नगरमध्ये रक्तदान शिबिर रविवारी (20 डिसेंबर) सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत आनंदऋषीजी रक्तपेढी येथे होणार आहे. या माध्यमातून नगर शहरातील व जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी पुढाकार घेऊन रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान करावे आणि राज्यातील रक्ताचा जो तुटवडा झाला आहे, तो रक्तदान करून काहीअंशी भरून काढण्यासाठी हातभार लावावा आणि असंख्य लोकांचे प्राण वाचवण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शिक्षक नेहमीच अशा प्रसंगी पुढे असतात आणि आणि ही एक सामाजिक गरज आहे. या माध्यमातून सर्व शिक्षकांनी रक्तदान करुन आपले कर्तव्य पार पाडावे, असे मत रक्तदान शिबीर आयोजक शहराध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी मांडले. मात्र, इतर आजार असणाऱ्या शिक्षकांनी यात सहभागी होऊ नये, असेही स्पष्ट केले गेले आहे. अधिक माहिती संपर्क - 9405636656.

Post a Comment

Previous Post Next Post