'त्या' बंधूंची तडीपारी झाली रद्द

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अकोले तालुक्यातील राजूर येथील अवैध दारु व्यवसाय व इतर गुन्ह्यात आरोपी असलेल्या शुक्ला बंधूंची तडीपारी आदेश खंडपीठाने रद्द केला आहे.

राजूर येथील संजय शुक्ला व राहुल शुक्ला या बंधुविरुद्ध नगर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी काढलेला तडीपारीचा आदेश नुकाताच औरंगाबाद खंडपीठाने रद्द केला आहे. शुक्ला बंधुना अवैद्य दारु व्यवसाय इतर दाखल गुन्ह्याबाबत तत्कालीन पोलिस अधीक्षकांनी १८ जून २०पासून नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका, ठाणे जिल्ह्यातील इगतपुरी तालुका व अहमदनगर जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले होते. या आदेशाला शुक्ला बंधुकडून नाशिक विभागीय आयुक्तांकडे अपील करून आव्हान देण्यात आले होते. या अपिलात झालेली तडीपारीची कारवाई काहीअंशी योग्य असल्याचे स्पष्ट केले गेले वदोन वर्ष तडीपारीची कारवाईपैकी संजय शुक्ला यास एक वर्षाकरीता व राहुल शुक्ला याची ९ महिनेकरीता तडीपारीचा आदेश करण्यात आला. या दोन्ही आदेशांना उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले. ॲड.मयूर सांळुके व ॲड.निखिल वाकचौरे यांनी शुक्ला बंधूंची बाजू मांडली. दिलेली नोटीस व केलेली कारवाई चुकीची असुन अतिरिक्त कारवाई करण्यात आली आहे व त्यांना आज पावेतो कुठल्याही गुन्ह्यात शिक्षा झालेली नसून पोलिसांनी व्यक्तिगत द्वेषातून कारवाई केल्याचे प्रथम दर्शनी दिसत असल्याचा दावा केला.

त्यावर न्यायमूर्ती टी.व्ही.नलावडे व एन.जी.शेवलीकर या खंडपीठाने ७ डिसेंबर २०२० रोजी नगर पोलिस अधीक्षक यांचा व विभागीय आयुक्त, नाशिक यांचा तडीपारीचा आदेश रद्द केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post