नगरच्या मुलींचा जगभरात डंका.. श्रीरामकृष्णच्या विद्यार्थिनींनी रोटरी स्पर्धा गाजवली

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

रोटरी इंटरनॅशनलच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नगरच्या मुलींनी यश मिळवून जगभरात आपला डंका वाजवला. येथील श्रीरामकृष्ण एज्युकेशन संस्थेच्या विद्यार्थिनींनी रोटरी इंटरनॅशनलच्या मुना-2020 कॉन्फरन्समध्ये उत्तुंग कामगिरी केली. रोटरी इंटरनॅशनलने विद्यार्थिनींना एक-एक देश विभागून दिला होता. गेल्या दोन महिन्यात विद्यार्थिनींनी संबंधित देशासंदर्भातील सर्व माहिती मिळवली व या कॉन्फरन्समध्ये ती सादर केली. या कॉन्फरन्समध्ये इयत्ता 12 वी कॉमर्समधील पूजा बोरा या विद्यार्थिनीला बक्षीस मिळाले.

श्रीरामकृष्ण एज्युकेशन फाउंडेशनच्या सेठ नंदलाल धूत इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनियर कॉलेजमधील सिद्धी गांधी व पूजा बोरा (बारावी कॉमर्स), समीक्षा मंत्री (अकरावी कॉमर्स), अनुष्का धामणे, कृपा कुलकर्णी व गौरी धोंगडे (दहावी) या विद्यार्थिनींनी रोटरी इंटरनॅशनलने आयोजित केलेल्या मुना-2020 या कॉन्फरन्समध्ये सहभाग घेतला. विद्यार्थिनींची तयारी संस्थेतील इंग्रजी विषयाच्या शिक्षिक सुषमा उजागरे व शिक्षक डेव्हिड साळवे यांनी करून घेतली. विद्यार्थिनींना यात सहभागी होण्यासाठी प्रतिभा धूत यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थी दशेतच विद्यार्थ्यांना जगाचे ज्ञान व्हावे, विविध देश, तेथील संस्कृती व वैशिष्ट्‌ये याची माहिती होवून त्यांचे सामान्यज्ञान तसेच अभ्यासवृत्ती वृध्दींगत होण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. श्रीरामकृष्ण एज्युकेशनच्या विद्यार्थिनींनी या कॉन्फरन्समध्ये सादर केलेल्या अभ्यास निबंधांचे सर्वांनी कौतुक केले. या विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष श्रीगोपाल धूत, उपाध्यक्ष नंदकुमार झंवर व मोहनलाल मानधना, सचिव डॉ.शरद कोलते, सहसचिव राजेश झंवर, सभासद बजरंग दरक व संस्थेचे इतर सभासद तसेच प्राचार्या राधिका जेऊरकर, समन्वयकसंपदा देशपांडे व सावित्री पुजारी यांनी कौतुक केले.

Post a Comment

Previous Post Next Post