जरे हत्याकांड : पसार बोठेबद्दल पोलिसांना दिली काहींनी माहिती

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील पसार आरोपी बाळ ज. बोठेसंदर्भात काहीजणांनी पोलिसांना माहिती दिली असून, पोलिसांनी त्या माहितीची खातरजमा करण्याचे काम सुरू केले आहे. पसार बोठेची माहिती देण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले होते. त्याला काहीजणांनी प्रतिसाद दिल्याचे सांगितले जाते. तसा दुजोराही पोलिस अधीक्षक पाटील यांनी दिला. ''आमच्याकडे काहीजणांनी माहिती दिलेली आहे. त्याचाही तपास सुरू केला असल्याचे'' त्यांनी सांगितले. दरम्यान, ''रेखा जरे खून प्रकरणामध्ये पोलीसांकडे भक्कम पुरावे आहेत'', असेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.

'जरे खून प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बोठे पसार आहे. त्याच्या संदर्भामध्ये आम्ही नागरिकांना माहितीसाठी आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद मिळत आहे. आम्हाला नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन-तीन ठिकाणी तपास तसेच माहिती घेण्यास सुरुवात केली असून, लवकरच आरोपीचे धागेदोरे मिळतील', असे पाटील यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, 'या खून प्रकरणातील ठोस पुरावे पोलिसांच्या हाती आहेत. या प्रकरणाचा तपास आम्ही पहिल्या दिवशी सुरू करून टेक्निकलसह इतर लागणारे सर्व पुरावे पोलिसांनी जमा केले आहेत. न्यायालयामध्ये आम्ही पसार आरोपीसंदर्भामध्ये म्हणणे सादर केले आहे', असे त्यांनी सांगितले. 

 

दरम्यान, नगर तालुक्यातील वाळकी येथील भालसिंग या युवकाची हत्या झाली होती. या प्रकरणात एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वाळकी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांना सांगितले असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post