पोलिस कर्मचाऱ्याची अवैध संपत्ती.. लाचलुचपतकडून सुरू उघड चौकशीएएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

जिल्हा पोलिस दलातील निलंबित पोलीस कर्मचारी रवींद्र कर्डिले यांच्या अवैध मालमत्तेची व कामकाजाची नाशिक लुचपत प्रतिबंध विभागामार्फत उघड चौकशी सुरू झाली आहे. यासंदर्भात येथील सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी तक्रार दाखल केली होती.

याबाबत शेख यांनी सांगितले की, अहमदनगर जिल्हा पोलिस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे निलंबित पोलीस कर्मचारी रवींद्र कर्डिले हे स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असताना नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाचप्रकरणी अटक केल्यानंतर पोलीस अधीक्षक यांनी त्यांना निलंबित केले आहे. कर्डिले यांनी  नातेवाईकांच्या नावे मोठ्या प्रमाणावर जंगम व स्थावर मालमत्ता खरेदी केली आहे. त्याची माहिती व तपशील लुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली आहे. या संपूर्ण प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंध विभागामार्फत उघड चौकशी करण्यात यावी, अशी मागणी महासंचालक एसीबी व पोलीस अधीक्षक, एसीबी नाशिक यांच्याकडे करण्यात आली होती. त्यांनी त्याची दखल घेऊन नाशिकचे उपअधीक्षक सतीश भामरे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करून कर्डिले यांची उघड चौकशी सुरू केलेली आहे, अशी माहिती शेख यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post