iPhone च्या खरेदीवर ६३ हजारांपर्यंत बंपर डिस्काउंट, काय आहे स्कीम?


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

Apple कंपनीने आपला सर्वात महागडा स्मार्टफोन iPhone 12 वर भरघोस डिस्काउंट देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने trade-in ऑफर आणली असून या ऑफरनुसार तुम्ही iPhone 12 हा लेटेस्ट आयफोन ३४ हजार रुपयांपर्यंतच्या सवलतीसह खरेदी करु शकतात. याशिवाय iPhone 11 Pro Max या फोनवर तब्बल ६३ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतं. तसंच, कंपनीच्या इतर सर्व फोनवरही डिस्काउंट मिळेल.

अ‍ॅपलच्या वेबसाइटनुसार, trade-in ऑफरमध्ये तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन देऊन डिस्काउंटचा लाभ घेऊ शकतात. कंपनीने स्मार्टफोनच्या एक्स्चेंज किंमतीबाबतची सविस्तर माहितीही आपल्या वेबसाइटवर शेअर केली आहे. तुम्ही apple.com/in/shop/trade-in वर याबाबतची माहिती बघू शकतात. या ऑफरची खासियत म्हणजे तुम्ही आयफोन १२ ला अ‍ॅपलशिवाय अन्य कंपन्यांच्या (सॅमसंग आणि वनप्लस) स्मार्टफोन्सशीही एक्स्चेंज करु शकतात.

या ऑफरमध्ये फोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला जुन्या स्मार्टफोनच्या IMEI कोड आणि स्टोरेजबाबत माहिती द्यावी लागेल. त्यानंतर अ‍ॅपलकडून किती रुपये डिस्काउंट मिळेल याबाबत माहिती दिली जाईल.

Post a Comment

Previous Post Next Post