बारावीच्या परीक्षेसाठीचे अर्ज १५ डिसेंबर ते ४ जानेवारी दरम्यान


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी नियमित, पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत आणि विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. त्यात नियमित विद्यार्थ्यांना १५ डिसेंबर ते ४ जानेवारीदरम्यान, तर पुनर्परीक्षार्थी, श्रेणीसुधार, व्यवसाय अभ्यासक्रम आदी विद्यार्थ्यांना ५ ते १८ जानेवारीदरम्यान अर्ज भरता येईल.

राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांना www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे अर्ज भरता येणार आहेत. अर्ज भरल्यानंतर शुल्क चलनाद्वारे १५ डिसेंबर ते २५ जानेवारीदरम्यान बँकेत भरायचे आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या यादी आणि प्री-लिस्ट चलनासोबत २८ जानेवारीला विभागीय मंडळात जमा करायची आहे. या वर्षी नव्याने १७ नंबरच्या अर्जाद्वारे नोंदणी करणाऱ्या खासगी विद्यार्थ्यांसाठी आवेदनपत्रे भरण्यासाठी स्वतंत्र कालावधी देण्यात येणार असल्याने त्या कालावधीत त्यांचे अर्ज भरू नयेत, असे डॉ. भोसले यांनी स्पष्ट के ले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post