एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सुत्रधार बाळ बोठे याच्याविरोधात खंडणी व बदनामी केल्याप्रकरणी तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. एका महिलेने ही फिर्याद दिली असून, यात डॉ.भागवत दहिफळे यालाही यात सहआरोपी करण्यात आले आहे.
बोठे याने बदनामीच्या उद्देशाने काही जणांना नाहक तक्रारी अर्ज करायला लावून जून 2019 दरम्यान चुकीच्या बातम्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध केल्या. मला त्रास देण्याच्या उद्देशानेच हे केले जात होते. कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याच्या खोट्या आरोपांचे आपण तेव्हा खंडण केले होते. 9 ऑगस्ट 2019 रोजी पत्रकार परिषद घेवून पुराव्यानिशी या बातम्या खोट्या व चुकीच्या असल्याचे सिद्ध केले होते. यानंतर बोठे याने 11 ऑगस्ट 2019 रोजी चर्चा करण्यासाठी मला बोलविले. डॉ.भागवत दहीफळे हे सर्व गोपनीय माहिती मला पुरवितात, असे बोठे याने सांगीतले. यातून बाहेर पडण्यासाठी तडजोड म्हणून बोठे याने 10 लाख रूपयांची मागणी केली. मात्र आपण त्यास असमर्थता दाखवली. त्यानंतर त्याने जिल्हा क्षयरोग विभागातून माझी कंत्राटी नोकरी घालविण्यासाठी यंत्रणेवर दबाव आणला. या कटात डॉ.भागवत दहीफळे सामील होता, असे फिर्यादीत म्हटले आहे. यावरून बोठे व दहिफळेविरोधात भादवि कलम 384, 385, 500, 501, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment