मोहरीमुळे पडेल तुमच्या सौंदर्यात भर


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

स्वयंपाक घरात सहज आढळणारा पदार्थ म्हणजे मोहरी. कोणत्याही पदार्थाची चव वाढवण्याचे काम मोहरी करते. कोशिंबीर, आमटी या पदार्थांना मोहरीची कडकडीत फोडणी बसली की त्या पदार्थाची रंगत काही औरच होते. मोहरीप्रमाणेच तिच्या तेलाचे, बियांचेदेखील तितकेच फायदे आहेत. केवळ पदार्थांची चव वाढवण्यापुरतीच मोहरी मर्यादित नसून तिचे अनेक फायदे आहेत. चला तर मग जाणून घेऊयात..

१. चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी उपयुक्त –

मोहरीप्रमाणेच तिचं तेल आणि बीदेखील तितकीच फायदेशीर आहे. त्वचेला ग्लो आणायचा असेल तर मोहरीच्या बिया उपयुक्त ठरतात. मोहरीच्या बियांमध्ये सल्फर तसेच, अँटी फंगल हे घटक असतात. कोरडी त्वचा असल्यास त्यावर मोहरीच्या बिया या चांगला उपाय असल्याचं सांगण्यात येत. या बियांमुळे त्वचेवर होणाऱ्या इनफेक्शनला दूर ठेवण्यास मदत होते. तसेच चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी मोहरीचे तेल उत्तम औषध आहे. मोहरीचे तेल, बेसन, दही आणि लिंबाचा रस मिसळून ते मिश्रण चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांनी धुवून टाका त्याने त्वचेचा रंग उजळल्यास मदत होईल.

२. केसांच्या वाढीसाठी लाभदायक –

अनेक महिला केस गळतीमुळे किंवा लहान केस असल्यामुळे त्रस्त असतात. अशा समस्येमध्ये मोहरीचं तेल फायदेशीर ठरतं. मोहरीच्या तेलामध्ये मोठ्या प्रमाणात बीटाकेरोटिन, आयरन, फॅटी अॅसिड, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम असते. यामुळे केसांना नियमित मसाज केल्याने केस मजबूत होतात. मोहरीच्या तेलात व्हिटॅमिन ए असल्याने केसांची वाढ झपाट्याने होते.

३. कर्करोग टळण्यास मदत –

मोहरीच्या तेलामध्ये ग्लुकोसिनोलेट गुण असल्याने कर्करोग टळण्यास मदत होते. हे शरिरात कर्करोग सेल्स तयार होऊ देत नाही.

४. त्वचेवरील मृत त्वचा दूर करण्यास मदत –

मोहरीच्या बियांचा वापर नैसर्गिक स्क्रब म्हणूनही करता येतो. मोहरीच्या बियांमध्ये गुलाब पाण्याचे ३-४ थेंब टाकून त्याची पेस्ट तयार करुन घ्यावी. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करावा. त्यामुळे चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाते.

५. दातदुखीपासून सुटका –

मोहरीचे अनेक फायदे आहेत. त्यातील एक फायदा म्हणजे दातदुखीपासून सुटका. दात दुखत असतील तर मोहरीच्या तेलामध्ये थोडेसं मीठ मिसळून दिवसातून दोन वेळा या पेस्टने दात घासावेत.

Post a Comment

Previous Post Next Post