'येथे' होते काळ्या सफरचंदाची शेती; किंमत ऐकाल तर चक्रावून जाल


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

निरोगी आणि सुदृढ आरोग्यासाठी आहारात फळे, पालेभाज्या, कडधान्य, दुग्धजन्य पदार्थ यांचा आवर्जुन समावेश करायला हवा. बऱ्याचवेळा आजारपणामध्ये डॉक्टर रुग्णांना फळे खाण्याचा सल्ला देतात. काही फळांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचं प्रमाण असतं. तर काही फळांमध्ये नैसर्गिक साखरेचं प्रमाण असतं त्यामुळे फळे खाणं कधीही आरोग्यासाठी चांगलंच. सफरचंद हे कोणत्याही आजारपणामध्ये सहज खाता येणारं फळ आहे. त्यामुळे या फळाला मागणीदेखील जास्त असते. साधारणपणे सफरचंद म्हटलं की लालबुंद सफरचंद पटकन डोळ्यासमोर येतात. मात्र आता बाजारात केवळ लालच नाही तर हिरव्या रंगाची सफरचंदही विक्रीसाठी येतात. त्यामुळे सामान्यपणे लाल आणि हिरवी सफरचंद साऱ्यांनाच माहित आहेत.परंतु जर काळ्या रंगाची सफरचंददेखील असतात असं तुम्हाला कोणी सांगितलं तर विश्वास बसेल? पण हे खरं आहे. तिबेटमध्ये काळ्या सफरचंदाची शेती करत असून हे सफरचंद प्रचंड महाग असतात.

काळी द्राक्ष साऱ्यांनाच माहित आहेत. परंतु काळं सफरचंद फार कमी जणांनी पाहिलं असेल. या काळ्या सफरचंदाची शेती तिबेटमध्ये करण्यात येत असून त्यांचा रंग पूर्णपणे वांग्याप्रमाणे काळा असतो. विशेष म्हणजे हे सफरचंद दुर्मिळ प्रकारचं आहे. त्यामुळे ते फार मोजक्या ठिकाणीच उपलब्ध होतं. तसंच त्याची चवदेखील लाल किंवा हिरव्या सफरचंदापेक्षा वेगळी असते. हे सफरचंद प्रचंड गोड असतं.

तिबेटच्या डोंगरावर होते शेती

दुर्मिळ असलेल्या या सफरचंदाला ब्लॅक डायमंड असं म्हणत असून ते हुआ नीयु या जातीचं आहे. तिबेटच्या पठारावर त्यांची शेती करण्यात येते. चायनीज लोकं त्याला रेड डिलिसियास म्हणतात. विशेष म्हणजे येथील वातावरणामुळे या फळाचा रंग काळा आहे. चीनमधील Dandong Tianluo Sheng Nong ई-कॉमर्स ट्रेड ही कंपनी ५० हेक्टर जमिनीवर याची शेती करते. ही जमीन समुद्राच्या तळापासून ३१०० मीटर उंचावर आहे. या ठिकाणचे तापमान दिवसा आणि रात्री खूप वेगळे असते. दिवसा भरपूर सूर्य प्रकाश मिळतो. त्यामुळे या सफरचंदाच्या गडद लाल रंगामध्ये बदल होऊन ती गडद काळ्या रंगाची होतात.

२०१५ मध्ये या सफरचंदाची शेती करण्यास सुरुवात झाली. ही फळं खासकरुन बीजिंग, शांघाई, गुआंगंजो आणि शेन्जॉन येथे विक्रीसाठी नेली जातात. या फळांची किंमत ५० युआन म्हणजे साधारणपणे ५०० रुपये असल्याचं सांगण्यात येतं. या फळाचं उत्पन्न अल्प प्रमाणात असल्यामुळे त्याची किंत जास्त आहे. या सफरचंदाचं झाडं पूर्ण होण्यासाठी त्याला ८ वर्षांचा कालावधी लागतो.

Post a Comment

Previous Post Next Post