चालताना मोबाइलचा वापर करताय? हा आहे धोका


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

जे लोक चालताना मोबाइलवर बोलतात किंवा संगीत ऐकतात त्यांच्यापेक्षाही जे लोक टेक्स्टिंग करतात त्यांना अपघात होण्याचा धोका अधिक असतो असे संशोधनात दिसून आले आहे. याबाबतचा शोधनिबंध इन्जुरी प्रिव्हेन्शन या नियतकालिकात प्रसिद्ध झाला असून, स्मार्टफोनवर टेक्स्टिंग हे पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे दिसून आले आहे. टेक्स्टिंगमुळे अनेक अपघात होताना राहिले आहेत. कारण यात रस्त्याच्या डाव्या किंवा उजव्या बाजूकडे बघण्याचे भान राहात नाही. कॅनडातील कॅलगरी विद्यापीठातील संशोधकांनी म्हटले आहे की, पादचाऱ्यांचे लक्ष विचलित झाल्याने अनेकदा त्यांना अपघातास सामोरे जावे लागते.

जगात दरवर्षी २ लाख ७० हजार पादचारी अपघातात मरतात. रस्ते अपघातात हे प्रमाण एक पंचमांश आहे. पादचाऱ्यांचे लक्ष विचलित होण्याने अनेक अपघात होतात त्यामुळे तो रस्ते सुरक्षेतील महत्त्वाचा घटक ठरला आहे. अलीकडच्या काळात जास्तीत जास्त लोक स्मार्ट फोन वापरत असल्याने या अपघातात भर पडली आहे. मोबाइल व पादचाऱ्यांचे अपघात यांचा विचार केला असता त्यात ३३ अभ्यासात असे दिसून आले की, मोबाइलवर संगीत ऐकण्याने किंवा मोबाइलवर बोलण्याने पादचाऱ्यांना अपघाताचा धोका तुलनेने कमी असतो.

जेव्हा आपण मोबाइलवर टेक्स्ट मेसेज (गद्य संदेश) पाठवतो तेव्हा लक्ष पूर्ण मोबाइलकडे असते त्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढतो. यात आठ निरीक्षणात्मक अहवालात असे दिसून आले की, टेक्स्टिंगमुळे पादचारी विचलित होण्याचे प्रमाण हे १२ ते ४५ टक्के असते. स्मार्टफोनवर समाजमाध्यमे, अॅहप, डिजिटल चित्रफिती सगळेच शक्य असते. त्यामुळे आपल्या जीवनाचे सगळेच अंग व्यापले गेले आहे त्यामुळे मोबाइलचा वापर चालताना करतेवेळीही काळजी घेणे गरजेचे आहे.

Post a Comment

Previous Post Next Post